Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंडोनेशियात भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दु:ख


नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2022

इंडोनेशियातील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मनोकामना व्यक्त करत, या दु:खाच्या काळात इंडोनेशियाच्या पाठीशी भारत ठामपणे उभा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान ट्वीट संदेशात म्हणाले;

इंडोनेशियातील भूकंपामुळे झालेल्या मालमत्ता आणि जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियां प्रति मनापासून सहवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही सदिच्छा. या दु:खाच्या काळात भारत इंडोनेशियासोबत उभा आहे.

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai