पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे इटलीच्या युद्ध-पश्चात इतिहासात सलग सर्वाधिक काळ पद भूषवणाऱ्या पंतप्रधान ठरल्याबद्दल अभिनंदन केले.
ही कामगिरी म्हणजे इटलीच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि जनतेच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. मेलोनी यांची मैत्री भारत-इटली विशेष धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. दोन्ही देशांतील जनतेच्या समृद्ध भविष्यासाठी त्यांच्यासोबत निकटचे सहकार्य सुरू ठेवण्यास उत्सुक असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. तसेच त्यांनी आगामी वर्षांत त्यांच्या निरंतर यशासाठी शुभेच्छा दिल्या
एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सामायिक केलेः
“माझ्या मित्र, पंतप्रधान मेलोनी यांचे इटलीच्या युद्ध-पश्चात इतिहासात सलग सर्वाधिक काळ पद भूषवणाऱ्या पंतप्रधान ठरल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. ही कामगिरी इटलीच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि जनतेच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
त्यांची मैत्री भारत-इटली विशेष धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरली आहे आणि आपल्या दोन्ही देशांतील जनतेच्या समृद्ध भविष्यासाठी आमचे निकटचे सहकार्य असेच पुढे नेण्यासाठी मी उत्सुक आहे.
येत्या वर्षांत त्यांच्या निरंतर यशासाठी माझ्याकडून शुभेच्छा.
@GiorgiaMeloni”
Congratulations to my friend Prime Minister Meloni on becoming the longest continuously serving Prime Minister in Italy’s postwar history. This milestone is a reflection of the trust and confidence of the Italian people in her leadership.
Her friendship has also been…
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Congratulations to my friend Prime Minister Meloni on becoming the longest continuously serving Prime Minister in Italy's postwar history. This milestone is a reflection of the trust and confidence of the Italian people in her leadership.
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2026
Her friendship has also been…
Mi congratulo con la mia amica, il Primo Ministro Meloni, per essere diventata il Primo Ministro con il mandato più lungo nella storia del dopoguerra italiano. Questo traguardo riflette la fiducia che il popolo italiano ripone nella sua leadership.
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2026
La sua amicizia è stata…