Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इथिओपियाच्या निवडणुकीत पंतप्रधान अबिय अहमद अली आणि प्रॉस्पेरिटी पार्टीच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 23 जून 2026

 

इथिओपियाच्या संसदीय निवडणुकीत निर्णायक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान अबिय अहमद अली आणि प्रॉस्पेरिटी पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

इथिओपियासोबत ऐतिहासिक, बहुआयामी आणि सखोल संबंध भारतासाठी अत्यंत मोलाचे आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. मागच्या वर्षीच्या आपल्या इथिओपिया भेटीची आठवण ताजी करत, भारत-इथिओपिया धोरणात्मक भागीदारी आणि दोन्ही देशांतील जनतेमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान अबिय अहमद अली यांच्यासोबत एकत्रित काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

मोदी यांनी ‘एक्स’ माध्यमावर वर पोस्ट केले;

इथिओपियाच्या संसदीय निवडणुकीत निर्णायक विजय मिळवल्याबद्दल माझे स्नेही, पंतप्रधान अबिय अहमद अली आणि प्रॉस्पेरिटी पार्टीचे मनःपूर्वक अभिनंदन.

इथिओपियासोबतचे ऐतिहासिक, बहुआयामी आणि सखोल संबंध भारतासाठी अत्यंत मोलाचे आहेत. गेल्या वर्षीच्या इथिओपिया भेटीचे  स्मरण करत आहे आणि आपली धोरणात्मक भागीदारी तसेच दोन्ही देशांतील जनतेमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी मिळून काम करण्यास उत्सुक आहे.

@AbiyAhmedAli

 

* * *

निलिमा चितळे/संदेश नाईक/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai