Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इराणचे सर्वोच्च नेते आणि राष्ट्राध्यक्ष रुहानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भेटवस्तू


इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला सय्यद अली-हुसैनी खामनेई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र कुराणाची सातव्या शतकातील दुर्मिळ हस्तलिखिताची विशेष प्रत भेट दिली. कूफी लिपीतल्या या हस्तलिखितांचे श्रेय चौथे खलिफा हजरत अली यांच्याकडे जाते. सांस्कृतिक मंत्रालयाच्या रामपूर रझा वाचनालयाच्या ताब्यात ही प्रत आहे.

पंतप्रधानांनी गालिबच्या फारसी भाषेतला कुलियात-ए-फारसी-ए-गालिब हा काव्य संग्रह इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. हसन रुहानी यांना भेट दिला. सुमेर चंद यांनी रामायणाचा पर्शियन भाषेत केलेला अनुवादही त्यांनी यावेळी भेट दिला.

1863 मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या कुलियात-ए-फारसी-ए-गालिब या संग्रहात मिर्झा गालिब यांच्या 11,000 आयत्यांचा समावेश आहे. 1867 च्या दुर्मिळ प्रतीतली ही प्रत असून गहाळ झालेली काही पानं 1872 च्या आवृत्तीतून वापरण्यात आली. मौलाना आझाद यांच्या वैयक्तिक संग्रहातली ही पाने असून नवी दिल्लीतल्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनच्या वाचनालयात ती जतन करण्यात आली आहेत.

1715 मध्ये पर्शियन भाषेत अनुवादीत करण्यात आलेलं आणि 1826 मध्ये प्रत काढण्यात आलेलं सुमेरचंद यांचे रामायणाचे दुर्मिळ हस्तलिखित सांस्कृतिक मंत्रालयाच्या रामपूर रझा वाचनालयाच्या ताब्यात आहे. या सचित्र प्रतीत 260 पेक्षा जास्त चित्रं असून रामायणाच्या हस्तलिखितातली ही कदाचित सर्वात जास्त चित्रसंख्या असावी.

N. Chitale/ B.Gokhale