पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला अंतराळ विभाग/भारतीय अंतराळ संशोधन संघटना (डीओएस/इस्रो) आणि कॅनेडिअन स्पेस एजन्सी (सीएसए) यांच्यातील अंतराळ क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. कॅनडातील ओटावा येथे 15 एप्रिल 2015 रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या करारामुळे इस्रो आणि सीएसएचे संयुक्त पथक स्थापन होईल जे एकत्रित प्रकल्प आणि कालमर्यादेसह कृती आराखडा तयार करतील. अंतराळ तंत्रज्ञानाच्या शांततापूर्ण वापर क्षेत्रातील वैविध्यपूर्ण संशोधनासाठी यामुळे संधी निर्माण होतील.
S.Kane/B.Gokhale