Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उच्च शिक्षणात भारत-जर्मन भागीदारी या कार्यक्रमाची सुलभ अंमलबजावणी करण्यासाठीच्या यापूर्वीच्या सामंजस्य करारातील किरकोळ सुधारणाबांबत भारत-जर्मनी दरम्यानच्या इराद्याबाबत संयुक्त घोषणा पत्रावर स्वाक्षऱ्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत उच्च शिक्षणात भारत-जर्मन भागीदारी या कार्यक्रमाची सुलभ अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वीच्या सामंजस्य करारातील काही किरकोळ सुधारणा करण्यास मंजूरी देण्यात आली.

या इराद्याबाबतच्या संयुक्त घोषणापत्रात कार्यक्रमाच्या शीर्षकातून “धोरण” ही संज्ञा वगळण्यात येईल, आणि हा कार्यक्रम उच्च शिक्षणात भारत-जर्मन भागीदारी असा होईल. तसेच या कार्यक्रमासाठी निधीचा कालावधी 2015-19 ऐवजी 2016-20 (1 जुलै 2016 ते 30 जून 2020) असा बदलण्यात येईल.

इराद्याबाबतच्या संयुक्त घोषणापत्रामुळे दोन्ही देशातील उच्च शिक्षण संस्थांना शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास या क्षेत्रात अभिनव भागीदारीतील गुणवत्तावाढीसाठी फायदा होईल. विद्यापीठातील विविध शाखांच्या विकासासाठी आणि भारतापुढे आव्हानात्मक असणाऱ्या प्राधान्य क्षेत्रातील प्रगत संशोधनाला जोपासण्यासाठी ते फायदेशीर ठरेल.

J.Patankar/S.Tupe