Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्कल एक्सप्रेस दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांना दु:ख


उत्तर प्रदेशमध्ये मुजफ्फरनगर जवळ उत्कल एक्सप्रेसला झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त लोकांना तातडीने मदत पुरवण्यात येत असून रेल्वे मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकार उद्‌भवलेल्या परिस्थितीकडे आणि मदत कार्याकडे काळजीपूर्वक लक्ष देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

“मुजफ्फरनगरजवळ रुळावरुन उत्कल एक्सप्रेस घसरल्यामुळे आपल्याला तीव्र वेदना झाल्या आहेत. या अपघातात मृत पावलेल्यांच्याप कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी माझी इच्छा आहे. एकंदर परिस्थितीवर रेल्वे मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकार काळजीपूर्वक लक्ष देत आहे. त्याचबरोबर अपघातग्रस्तांना सर्वोत्तोपरी मदत तातडीने पुरवली जात आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

N.Sapre/S.Bedekar/Anagha