पीएम्इंडिया
राष्ट्राध्यक्ष आणि माझे मित्र मून जेई इन जी, सॅमसंगचे उपाध्यक्ष जे वाय ली,कोरिया आणि भारताचे प्रतिनिधी आणि उपस्थित मान्यवर,
माझे मित्र राष्ट्राध्यक्ष मून यांच्यासमवेत नोएडा इथे उभारलेल्या सॅमसंगच्या या कारखान्यात येणे हा माझ्यासाठी अतिशय सुखद अनुभव आहे.मोबाईल उत्पादनाचा नवा कारखाना, भारताबरोबरच उत्तर प्रदेश आणि नोएडा साठी अभिमानाचा विषय आहे.या नव्या कारखान्यासाठी सॅमसंगच्या संपूर्ण चमूला अनेक शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो.
मित्रहो, भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने आजची संधी अतिशय विशेष आहे. 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सॅमसंगचे भारताशी व्यापारी संबंध मजबूत करण्याबरोबरच भारत आणि कोरिया यांच्यातल्या संबंधासाठीही महत्वपूर्ण ठरेल. सॅमसंगचे जागतिक संशोधन आणि विकास केंद्र भारतात आहे आता हा उत्पादन कारखानाही आमचा गौरव वाढवेल.
मित्रहो, व्यापारी समुदायाशी माझी जेव्हा चर्चा होते तेव्हा मी नेहमीच एक गोष्ट सांगतो. घरात किमान एकही कोरियन उत्पादन दिसत नाही असे मध्यम वर्गीय घर भारतात क्वचितच आढळेल.भारतीय लोकांच्या जीवनात सॅमसंगने निश्चितच आपले विशेष स्थान प्राप्त केले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या स्मार्ट फोन बाजारपेठेत हे फोन आज जगात अग्रणी आहेत. सॅमसंगच्या नेतृत्वाशी माझी जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी त्यांना भारतात उत्पादन करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले आहे.आज नोएडा मधे झालेले हे आयोजन त्याचेच प्रतिबिंब आहे.आज डिजिटल तंत्रज्ञान, जन सामान्यांचे जीवन सुलभ करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.आज भारतात सुमारे 40 कोटी स्मार्ट फोन वापरात आहेत,32 कोटी लोक ब्रॉडबॅंड वापरत आहेत,अतिशय कमी दरात इंटरनेट डेटा उपलब्ध आहे,देशातल्या एक लाखाहून अधिक ग्राम पंचायतीपर्यंत फायबर नेटवर्क पोहोचले आहे.या सर्व बाबी म्हणजे देशात होत असलेल्या डिजिटल क्रांतीचे संकेत आहेत.
मित्रहो,स्वस्त मोबाईल फोन,वेगवान इंटरनेट, स्वस्त डाटा यामुळे आज वेगवान आणि पारदर्शी सेवा सुनिश्चित झाली आहे.वीज-पाण्याचे बिल भरायचे असू दे,शाळा, महाविद्यालयासाठी प्रवेश असू दे,भविष्य निर्वाह निधी किंवा निवृत्ती वेतन, जवळपास सर्वच सुविधा ऑनलाईन मिळत आहेत.देशभरातली सुमारे 3 लाख सामाईक सेवा केंद्रे गावकऱ्यांसाठी काम करत आहेत.तर शहरात मोफत वाय-फाय हॉटस्पॉट, गरीब आणि मध्यम वर्गीय युवकांच्या आकांक्षांना नवे पंख देत आहे.
एवढेच नव्हे तर गव्हर्मेंट ई बाजारपेठेच्या माध्यमातून सरकार आता थेट उत्पादकाकडून वस्तू खरेदी करत आहे.यामुळे लघु आणि मध्यम उद्योजकांना लाभ तर होतोच त्याचबरोबर सरकारी खरेदीत पारदर्शकताही वाढली आहे.
मित्रहो, आज डिजिटल व्यवहार सातत्याने वाढत आहेत.भीम एप आणि रूपे कार्ड यांच्या सहाय्याने व्यवहार अतिशय सुलभ झाला आहे. जून महिन्यात सुमारे 41 हजार कोटी रुपयांचा व्यवहार भीम एप च्या माध्यमातून झाला आहे.आज भीम आणि रूपे बाबत केवळ देशातच नव्हे तर जगभरात उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी सिंगापूरमध्येही या दोन सुविधांचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली.आज होत असलेले हे आयोजन भारताच्या नागरिकांच्या सबलीकरणात योगदान तर देईलच त्याच बरोबर मेक इन इंडिया अभियानालाही गती देईल.
मित्रहो, “मेक इन इंडिया” प्रती आमचा आग्रह म्हणजे केवळ आर्थिक धोरणाचा भागच नव्हे तर कोरिया सारख्या आमच्या मित्र राष्ट्रांबरोबर उत्तम संबंध ठेवण्याचा संकल्पही आहे. सॅमसंग सारख्या विश्वसनीय नाममुद्रेला नवी संधी देण्याबरोबरच जगभरातल्या प्रत्येक व्यावसायिकाला खुले निमंत्रण आहे,जो नव भारताच्या पारदर्शी व्यापार संस्कृतीचा लाभ घेऊ इच्छित आहे. भारताची वृद्धिंगत होणारी अर्थव्यवस्था आणि वाढता नव मध्यम वर्ग, गुंतवणुकीच्या विपुल संधीचे भांडार आहे. या अभियानाचे आज जगभरात स्वागत होत आहे, सहकार्य मिळत आहे याचा मला आनंद आहे. मोबाईल फोन निर्मितीबाबत बोलायचे झाले तर आज भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
गेल्या चार वर्षात, मोबाईल निर्मिती कारखान्यांची संख्या 2 वरून 120 झाली आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की यात 50 पेक्षा जास्त तर नोएडातीलच आहेत. यातून 4 लाखापेक्षा जास्त युवकांना थेट रोजगार मिळाला आहे. रोजगार निर्मितीतही सॅमसंगची अग्रणी भूमिका राहिली आहे. संपूर्ण देशात आपण सुमारे 70 हजार लोकांना थेट रोजगार पुरविला आहे ज्यात साधारणपणे 5 हजार लोक नोएडामधेच आहेत. या नव्या कारखान्यामुळे आणखी एक हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. इथे निर्माण होत असलेला कारखाना, हा कंपनीचा सर्वात मोठा मोबाईल फोन निर्मिती कारखाना असेल अशी माहिती मला देण्यात आली आहे. इथे दर महिन्याला साधारणतः 1 कोटी फोनची निर्मिती होईल. इथे होणाऱ्या उत्पादनापैकी 30 टक्के निर्यात होणार असून जगभरातल्या विविध देशात हे फोन जातील. यामुळे जागतिक बाजारपेठेत आपली स्थिती निश्चितच आणखी मजबूत होणार आहे. म्हणजेच कोरियाचे तंत्रज्ञान आणि भारताचे उत्पादन आणि सॉफ्टवेअर यांच्या आधारावर आपण जगासाठी सर्वोत्तम उत्पादन तयार करणार आहोत. ही आपल्या दोन्ही देशाची ताकद आहे आणि हाच आमचा सामाईक दृष्टीकोन आहे.
सॅमसंगच्या संपूर्ण चमूचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि अनेक शुभेच्छा देतो.आपण मला इथे आमंत्रित केले, या कार्यक्रमात सहभागी करून घेतले याबद्दल खूप-खूप धन्यवाद.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
अपने मित्र President Moon के साथ नोएडा में बनी Samsung की इस फैक्ट्री में आना मेरे लिए बहुत सुखद अनुभव है। मोबाइल मैन्यूफैक्चरिंग की नई यूनिट भारत के साथ ही ये उत्तर प्रदेश और नोएडा के लिए भी गर्व का विषय है। इस नई यूनिट के लिए Samsung की पूरी टीम को बहुत-बहुत बधाई: PM
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
भारत को manufacturing का वैश्विक हब बनाने की दिशा में आज का दिन बहुत विशेष है।
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
5 हज़ार करोड़ रुपए का ये निवेश ना सिर्फ Samsung के भारत में व्यापारिक रिश्तों को मजबूत बनाएगा, बल्कि भारत और कोरिया के संबंधों के लिए भी अहम सिद्ध होगा: PM @narendramodi
जब भी बिजनेस कम्यूनिटी के लोगों से मेरी बातचीत होती है तो एक बात मैं अक्सर कहता हूं। भारत में शायद ही ऐसा कोई मिडिल क्लास घर हो जहां कम से कम एक कोरियाई प्रोडक्ट ना पाया जाता हो: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
निश्चित तौर पर भारतीय लोगों के जीवन में Samsung ने अपना विशेष स्थान बनाया है। खासतौर पर आपके फोन, तेज़ी से बढ़ रहे Smart Phone Market में आज World Leader की तरह हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
आज Digital Technology सामान्य नागरिक के जीवन को सरल बनाने में अहम भूमिका निभा रही है। आज भारत में लगभग 40 करोड़ स्मार्टफोन उपयोग में है, 32 करोड़ लोग ब्रॉडबैंड इस्तेमाल कर रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
बहुत कम दर पर इंटरनेट डेटा उपलब्ध है, देश की एक लाख से अधिक ग्राम पंचायतों तक फाइबर नेटवर्क पहुंच चुका है। ये सारी बातें, देश में हो रही डिजिटल क्रांति का संकेत हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
सस्ते मोबाइल फोन, तेज़ इंटरनेट, सस्ते डेटा के चलते आज Fast और Transparent Service Delivery सुनिश्चित हुई है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
GeM यानि Government e Market के जरिए सरकार अब सीधे Producers से सामान की खरीदारी कर रही है। इससे Medium और Small Entrepreneurs को भी लाभ हुआ है तो सरकारी खरीदारी में Transparency भी बढ़ी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
बिजली – पानी का बिल भरना हो, स्कूल-कॉलेज में एडमिशन हो, PF हो या पेंशन, लगभग हर सुविधा ऑनलाइन मिल रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
देशभर में फैले लगभग 3 लाख कॉमन सर्विस सेंटर गांव वालों की सेवा में काम कर रहे हैं। तो शहरों में फ्री Wi Fi Hotspot गरीब, मध्यम वर्गीय युवाओं की आकांक्षाओं को नई उड़ान दे रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
'Make in India' के प्रति हमारा आग्रह सिर्फ एक Economic Policy का हिस्सा भर नहीं है, बल्कि ये कोरिया जैसे हमारे मित्र देशों के साथ रिश्तों का संकल्प भी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
भारत की बढ़ती हुई अर्थव्यवस्था और बढ़ता हुआ Neo Middle Class निवेश की असीम संभावनाओं से भरा हुआ है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018
मुझे प्रसन्नता है कि इस Initiative को आज दुनियाभर से सहयोग मिल रहा है। मोबाइल फोन Manufacturing की अगर बात करें तो आज भारत दुनिया में दूसरे नंबर पर पहुंच गया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 9, 2018