पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तराखंडमधल्या काशीपूर जिल्हयातील हेमपूरमधील नेपानगरची 803 एकर जमीन उत्तराखंड सरकारला परत देण्यासाठी मंजूरी देण्यात आली. ही जमीन नेपा लिमिटेडकडे होती. नेपानगर हा भारत सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
पार्श्वभूमी
ही जमीन तत्कालीन उत्तरप्रदेश राज्य औद्योगिक विकास महामंडळाने फेब्रुवारी 1987 मध्ये नेपा लिमिटेडला 90 वर्षाच्या भाडेतत्वावर दिली होती. त्यावेळच्या दरानुसार केलेल्या हिशोबाप्रमाणे ही जमीन नेपा लिमिटेडला 149.23 लाख रुपयात देण्यात आली होती. ही जमीन नेपा लिमिटेडला ऊसाच्या चिपाडांपासून वृत्तपत्र कागद उत्पादनासाठी देण्यात आली होती. मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची पर्यावरण मंजूरी न मिळाल्याने भाडेकरार लागू झाला नाही. त्यामुळे वृत्तपत्र कागदनिर्मितीचा कारखाना स्थापना करता आला नाही. उत्तराखंड सरकारने सध्याच्या दरानुसार ही जमीन परत मागितली होती ज्यामुळे या जमिनीचा इतर कामासाठी वापर होऊ शकेल.
J.Patnakar/S.Tupe