Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एचटी लीडरशीप समिटमध्ये पंतप्रधानांचे भाषण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे हिंदुस्थान टाइम्स लीडरशीप समिटला संबोधित केले.

देशाची उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल सुरु आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भारताच्या सध्याच्या स्थितीकडे जागतिक संदर्भातून पाहिले जावे तसेच काही वर्षांपूर्वीची भारताची स्थिती, यासंदर्भातूनही पाहिले जावे.

पंतप्रधानांनी आर्थिक सुधारणांबाबतचा त्यांचा दृष्टिकोनही स्पष्ट केला आणि 7.4 टक्के आर्थिक विकास दर, उद्योग सुलभता अशा काही अलिकडच्या काळातल्या महत्त्वाच्या यशाचा उल्लेख केला. केंद्र आणि राज्यांनी दोघांनी मिळून काम केले तर उद्योगसुलभता अधिक सुधारु शकते, असे पंतप्रधानांनी सांगितले. 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांना आता अतिरिक्त निधी देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

एलपीजी अनुदानाचे थेट हस्तांतरण आणि एलईडी दिव्यांच्या योजनांमुळे करोडो रुपये कसे वाचले आहेत, याबाबतही पंतप्रधानांनी स्पष्ट करुन सांगितले. युरियाच्या गैरवापर रोखण्यात उचलेल्या प्रभावी पावलांबाबतही त्यांनी सांगितले. बिहारमध्ये बांधावयाच्या इंजिन निर्मितीच्या दोन एककांसाठी परदेशी थेट गुंतवणुकीबाबतही पंतप्रधानांनी सांगितले.

वीज न पोहोचलेल्या 18 हजार गावांच्या विद्युतीकरणाच्या प्रक्रियाबाबतही पंतप्रधान बोलले. ग्रामीण विद्युतीकरण ॲपच्या माध्यमातून या प्रक्रियेची प्रगती जाणून घेता येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

S.Kulkarni/S.Tupe/M.Desai