Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एसटीसीडब्ल्यू, 78 मधील तरतुदी आणि सुधारणांनुसार स्पर्धात्मक प्रमाणपत्रांना परस्पर मान्यता देणाऱ्या भारत आणि युएईमधल्या सामंजस्य करारासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पर्धात्मक प्रमाणपत्रांच्या परस्पर मान्यतेबाबतच्या भारत आणि संयुक्त अरब अमिरातीतील सामंजस्य करारासाठी मान्यता देण्यात आली.

प्रस्तावित सामंजस्य करारामुळे दुसऱ्या देशातील सरकारांनी खलाशांना जारी केलेल्या वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्रांना, सागरी शिक्षण व प्रशिक्षण, प्रशिक्षण पुराव्यांना, स्पर्धात्मक प्रमाणपत्रांना मान्यता मिळणार आहे. खलाशांच्या प्रशिक्षणाबाबतचे दोन्ही देशांमधले सहकार्य यामुळे वृद्धिंगत होणार आहे.

एसटीसीडब्ल्यू ठरावानुसार आवश्यक खलाशांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि चाचणी याची हमी या सामंजस्य करारामुळे दिली जाईल.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar