Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 30 जुलै 2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल, भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

आमच्या नेमबाजांचा अभिमान वाटतो!

#Olympics मधील 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल @realmanubhaker आणि सरबज्योत सिंह यांचे अभिनंदन.या दोघांनी उत्तम कौशल्य आणि संघ भावनेचे प्रदर्शन केले आहे. भारताला अत्यंत आनंद झाला आहे.

मनूसाठी, हे तिचे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक आहे, जे तिची सातत्यपूर्ण उत्कृष्टता आणि समर्पण दर्शवते. #Cheer4Bharat”

 

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai