पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑस्ट्रेलिया बरोबरच्या नागरी अणू सहकार्य कराराला मंजूरी देण्यात आली.
13 नोव्हेंबर, 2015 ला हा करार अंमलात आणण्यात आला असून त्यासाठी प्रशासनिक व्यवस्थाही करण्यात आली. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या इंधन पुरवठा व्यवस्थेमुळे अणु ऊर्जा विस्तारात सहकार्याव्दारे ऊर्जा सुरक्षितता वृध्दिंगत व्हायला मदत होणार आहे.
2015 या वर्षात नागरी अणू सहकार्याला चालना देणा-या अनेक ठळक घडामोडी झाल्या. जपानचे पंतप्रधान ॲबे यांच्या डिसेंबर मधल्या भारत भेटीत व्दिपक्षीय नागरी अणू करारावर स्वाक्ष-या झाल्या. 2015 च्या 25-27 जानेवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आदरातिथ्य केले त्या दरम्यान नागरी अणू करार कार्यान्वयनाबाबत पुन्हा बोलणी झाली.
रशिया आणि फ्रांन्स समवेत नागरी अणू सहकार्य या वर्षात पुढे नेण्यात आले. तर कॅनडा बरोबर युरेनियमच्या पुरवठयाबाबतही करार पूर्णत्वाला गेला आहे.
N.Chitale/M.Desai