Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओदिशा आणि पंजाबमधल्या रस्ते प्रकल्पांमुळे पायाभूत विकास आणि दळणवळणाला गती मिळेल-पंतप्रधान


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने ओदिशा आणि पंजाबमधील रस्ते प्रकल्पांना आज मंजूरी दिली. या प्रकल्पांमुळे, या राज्यांत पायाभूत विकास आणि दळणवळणाला गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पंजाबमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 344-A वरच्या पगवाडा-रुपनगर दरम्यानच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यास आज मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. या प्रकल्पासाठी 1442.42 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ओदिशा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 42 वरच्या अंगुल-संबलपूर दरम्यान चौपदरीकरणाच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. यासाठी 2491.53 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरच्या औरंगाबाद-तेलवाडी दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्तावही मंत्रिमंडळाने संमत केला. या कामासाठी 2028.91 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पाअंतर्गत 87 किलोमीटर लांब महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे.

या मार्गामुळे, या प्रदेशातील जनतेच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.

R.Aghor/B.Gokhale