पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी विद्यार्थ्यांच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी एनआयएफटी कॅम्पस अद्ययावत करण्याचा आणि निधी खर्च करण्याच्या कालमर्यादेतही वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
कालमर्यादेत वाढ केल्यामुळे उपलब्ध असलेला 90.13 कोटी रुपयांचा निधी 31.03.2015 ऐवजी मार्च 2017 पर्यंत वापरता येईल. यामुळे एनआयएफटीमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी परिसर अद्ययावत करता येईल व कॅम्पस अधिक प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने वापरता येईल.
पार्श्वभूमी :-
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने 1986 मध्ये एनआयएफटीची 1860 च्या सोसायटीज रजिस्ट्रेशन कायद्यांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून स्थापना केली. फॅशन जगतातील आधुनिक तंत्रज्ञानाविषयी दर्जात्मक शिक्षण देणे हा यामागचा उद्देश आहे. देशभरात 15 ठिकाणी एनआयएफटीकडून पूर्णवेळ पदवी कार्यक्रम चालवले जातात. एनआयएफटी कॅम्पस अद्ययावत करणे आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणे यासंदर्भात अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यास या योजनेमुळे मदत होणार आहे. अतिरिक्त वर्गखोल्यांची बांधणी करणे, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांची उभारणी, यंत्रसामुग्री व इतर उपकरणांची खरेदी करता येईल.
S.Thakur/S.Tupe/N.Sapre