Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओमानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यूसुफ बिन अलावी बिन अब्दुल्ला यांची पंतप्रधानांशी चर्चा

ओमानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यूसुफ बिन अलावी बिन अब्दुल्ला यांची पंतप्रधानांशी चर्चा


ओमानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यूसुफ बिन अलावी बिन अब्दुल्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

दोन्ही देशांमधले संबंध आणि विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याने होत असलेल्या प्रगतीचा आढावा यावेळी दोन्ही नेत्यांनी घेतला.

ओमानचे सुलतान कबूस बिन सईद अल सईद यांच्या शुभेच्छा अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांना दिल्या. पंतप्रधानांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत सुलतान सईद यांना आपल्या शुभेच्छा कळवल्या.

B.Gokhale/R.Aghor/Anagha