Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कर्नाटकच्या मांड्या इथे झालेल्या बस अपघातातील मृतांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोक संवेदना


कर्नाटकच्या मांड्या इथे झालेल्या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

‘कर्नाटकच्या मांड्या इथे झालेल्या अपघाताच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले आहे. या अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या परिस्थितीतून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B. Gokhale/R.Aghor/D. Rane