Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कांस्यपदक जिंकल्याबद्दल सेल्वा प्रभू तिरुमारन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


 

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धा 2026 मधील उडी प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल सेल्वा प्रभू तिरुमारन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, सेल्वा प्रभू तिरुमारन यांनी आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत कांस्यपदक पटकावले.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करत पंतप्रधानांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

समाजमाध्यम ‘एक्स’ वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले,

“वैयक्तिक सर्वोत्तम उडीची नोंद करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या सेल्वा प्रभू तिरुमारन यांचा आपल्याला अभिमान आहे. त्यांच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये त्यांनी अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी, हीच शुभेच्छा.”

#CWG2026”

***

यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai