Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कुंभमेळयामध्ये अतिवृष्टीमुळे भाविकांचा झालेला अंत दुर्देवी – पंतप्रधान


उज्जैन येथे अतिवृष्टीमुळे कुंभमेळयामध्ये सहभागी झालेल्या भाविकांचा अंत दुर्देवी असलयाची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. कुंभमेळयाला आलेल्या संत महंतांच्या तसेच पर्यटकांच्या सुखरुपतेसाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली आहे.

“जोरदार वृष्टीमुळे कुंभपर्वात झालेल्या जीवितहानीच्या वृत्तामुळे आपल्याला तीव्र वेदना होत आहेत. दुर्घटनाग्रस्तांना या दु:खद प्रसंगातून बाहेर पडण्याचे मानसिक बळ परमात्याने दयावे, अशी प्रार्थना. जखमींच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, अशी आशा असून कुंभपर्वात सहभागी झालेल्या संत आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करीत आहे” असे पंतप्रधानांनी सांगितले.

S.Bedekar/B.Gokhale