Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कृषी आणि संलग्न क्षेत्रातल्या सहकार्यासाठी विविध देशांसोबत सामंजस्य करार


कृषी आणि संलग्न क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारत आणि विविध देशांदरम्यान स्वाक्षऱ्या झालेल्या सामंजस्य करारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली.

हा सामंजस्य करार वैज्ञानिक व तंत्रज्ञांच्या भेटीच्या माध्यमातून क्षमता वृध्दी, ज्ञानाचे आदान-प्रदान करायला सहाय्य करेल, तसेच शेतकऱ्यांच्या शेतात कृषी उत्पादन वाढवण्यासाठी अचूक तंत्रज्ञान विकसित करण्यात आणि कृषी प्रयोगांसाठी हा करार सहाय्यभूत ठरेल. यामधून जे कौशल्य आणि तंत्रज्ञान विकसित होईल त्याचा वापर देशात गरजेनुसार केला जाईल.

S.Mhatre/S,Tupe/M.Desai