Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि लिधुआनिया यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि लिधुआनिया दरम्यानच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली.

या कराराअंतर्गत कृषी उत्पादन क्षेत्र, उद्यानविद्या, सुगीनंतरचे व्यवस्थापन, सेंद्रीय शेती, शीतगृह साखळी विकास, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुपालन, दुग्धोत्पादन, मत्स्योत्पादन, यासह कृषी उत्पादन क्षेत्रातील सहकार्य उपलब्ध होणार आहे. या कराराच्या त्वरीत अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या सहकार्याने कार्य आराखडा तयार केला जाणार आहे. या करारामुळे क्षमता वृद्धी, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांमधे ज्ञानाचे आदानप्रदान, जेनकिय स्रोतांची देवाणघेवाण, तसेच कृषी उत्पादन वाढीसाठी योग्य तंत्रज्ञान आणि चांगल्या कृषी प्रथांचा विकास आदी बाबतीत मदत होणार आहे.

S.Tupe / M. Desai