पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या तांत्रिक कॅडरची गट “अ” सेवा सुरु करायला मंजुरी दिली. यापूर्वी श्रम रोजगार मंत्रालयात रोजगार आणि प्रशिक्षण महासंचालनालय होते. नवी सेवा भारतीय कौशल्य विकास सेवा (आयएसडीएस) म्हणून ओळखली जायची.
कॅडर रचनेत पुढील बदलांनाही मंजुरी दिली गेली.
एसएजी स्तरावर एक पद वाढवणे.
जेएजी स्तरावर चार पदे वाढवणे.
एसटीएस स्तरावर सात पदे वाढवणे.
जेटीएस स्तरावर 12 पदे कमी करणे.
मंत्रिमंडळाने एसटीएस स्तरावर एसडीपीच्या 15 टक्क्यांपर्यंत एनएफएसजी सुरु करायला मंजुरी दिली आहे जी गट “अ” अभियांत्रिकी सेवेत लागू आहे.
यामुळे संस्थेच्या क्षमतेत आणि कार्यक्षमतेत वाढ होईल.
S.Kulkarni/S.Tupe