Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिवर्तनात कशा प्रकारे योगदान देईल याचे सर्वसमावेशक चित्र मांडले आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी आज लोकसभेत केलेल्या आपल्या भाषणात या वर्षीचा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या आर्थिक परिवर्तनाला कसा हातभार लावेल याचे सर्वसमावेशक  चित्र मांडले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. “त्यांनी रिफॉर्म एक्सप्रेस, सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योगांना पाठबळ, कौशल्य विकास, पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांना चालना  देण्याचे प्रयत्न अशा मुद्द्यांवर भर दिला”, असे पंतप्रधान म्हणाले.

एक्स या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“लोकसभेतील आपल्या भाषणात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या आर्थिक परिवर्तनात कसा हातभार लावेल याचे सर्वसमावेशक चित्र मांडले. त्यांनी रिफॉर्म एक्सप्रेस, एमएसएमईंना पाठिंबा, कौशल्य विकास, पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांना चालना देण्याचे प्रयत्न अशा मुद्द्यांवर भर दिला.”

@nsitharaman

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai