पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अतिरिक्त महागाई भत्ता तर निवृत्तीवेतनधारकांना डीआर देण्याला मंजूरी देण्यात आली. 1.1.2016 च्या पूर्वलक्षी प्रभावाने हा भत्ता देण्यात येईल.
यामुळे मूळ पगार किंवा निवृत्तीवेतनाच्या सध्याच्या 119 टक्क्यात 6 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींवर आधारित ही वाढ करण्यात आली आहे. यामुळे 2016-17 या वर्षात सरकारच्या तिजोरीवर महागाई भत्त्याचा प्रतिवर्षी 6796.50 कोटी तर डीआरसाठी 7929.24 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
N.Chitale/S.Tupe/M.Desai