पीएम्इंडिया
अपारंपरिक उर्जेच्या जाळ्याचे मोठ्या प्रमाणावर एकात्मिकरण करण्याच्या क्षेत्रात, नियामक मंच आणि राष्ट्रीय नियामक उपयोगिता आयुक्त संघटनेमध्ये सामंजस्य करार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
या सामंजस्य करारामुळे अपारंपरिक उर्जेच्या व्यापक एकात्मिकरणाशी संबंधित सहकार्याची खालील क्षेत्रे उपलब्ध होणार आहेत.
•अपारंपरिक उर्जा प्राप्त करण्याच्या चौकटीचा आराखडा- आंतरराष्ट्रीय अनुभव
•राज्य आणि केंद्रीय अपारंपरिक उर्जा खरेदी बंधने, अपारंपरिक उर्जा प्रमाणपत्र चौकट यांसारख्या नियामक बाबींचे पाठबळ
•उर्जा खरेदी करार/ कंत्राटे
•भार अंदाज तंत्रज्ञान व प्रक्रिया अशी विविध क्षेत्रे या करारामुळे उपलब्ध झाली आहेत.
N.Sapre/S.Patil/Anagha