Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाने दमण आणि दीव नगरपालिका (दुरुस्ती) नियमन, 2018,


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दमण आणि दीव नगरपालिका (दुरुस्ती) नियमन, 2018, दादरा आणि नगर हवेली, नगरपालिका परिषद (दुरुस्ती) नियमन, 2018, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह (नगरपालिका) दुरुस्ती नियमन 2018 प्रस्तावाला मंजुरी दिली.

प्रभाव:

दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली आणि अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांच्या नगरपालिकांना संविधान, प्रशासन आणि अधिकार संदर्भात उत्तम तरतुदी सुनिश्चित करण्यास मदत मिळेल. पक्ष-बदल विरोध, सकारात्‍मक अविश्‍वास ठराव, लोकपाल स्‍थापना आदींशी संबंधित तरतुदी अनुक्रमे दमण आणि दीव नगरपालिका (दुरुस्ती) नियमन, 1968 , दादरा आणि नगर हवेली, नगरपालिका परिषद (दुरुस्ती) नियमन, 2004, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह (नगरपालिका) दुरुस्ती नियमन 1994 मध्ये समाविष्ट केल्या जातील.

विवरण:

पक्ष -बदल विरोध, सकारात्‍मक अविश्‍वास ठराव, लोकपाल स्‍थापना आदींशी संबंधित तरतुदी अनुक्रमे दमण आणि दीव नगरपालिका (दुरुस्ती) नियमन, 1968, दादरा आणि नगर हवेली, नगरपालिका परिषद (दुरुस्ती) नियमन, 2018, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह (नगरपालिका) दुरुस्ती नियमन 2018 मध्ये समाविष्ट केल्या जातील.

नियमांमध्ये अन्य दुरुस्त्यादेखील समाविष्ट केल्या जातील. उदा. (i) ‘सेवक’ ऐवजी ‘कर्मचारी’, (ii)इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या माध्यमातून मतदानाची तरतूद, (iii) सीसीएस (सीसीए) नियम, 1965 दंड प्रक्रियेत लागू करणे आणि (iv) अनेक वर्षांपूर्वी ठरवलेल्या दंडाच्या रकमेत सुधारणा.

N.Sapre/S.Kane/D.Rane