पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई मदत 1 जुलै 2015 पासून जारी करायला मंजुरी दिली. यामुळे महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ होऊन तो मूळ वेतनाच्या 119 टक्के झाला आहे. सुमारे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 56 लाख निवृत्तीवेतनधानकांना याचा लाभ होईल.
सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित सूत्रानुसार ही वाढ आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 6655.14 कोटी रुपये बोजा पडेल. तर चालू आर्थिक वर्षात (जुलै 2015 ते फेब्रुवारी 2016) 4436.76 कोटी रुपये बोजा पडेल.
S. Kane/S.Tupe