Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता आणि निवृत्तिवेतनधारकांना महागाई दिलासा द्यायला मंजुरी दिली आहे. 1 जानेवारी 2018 पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही वाढ लागू असेल. महागाईच्या पार्श्वभूमीवर याअंतर्गत मूळ वेतन/निवृत्तीवेतनाच्या सध्याच्या ५ टक्क्यांमध्ये दोन टक्के वाढ करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सुमारे 48.41 लाख कर्मचाऱ्यांना आणि 61.17 लाख निवृत्तीवेतन धारकांना लाभ मिळेल.

महागाई भत्ता आणि महागाई दिलासा यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 6077.72 रुपये आणि आर्थिक वर्ष 2018-19 (जानेवारी 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंतचे 14 महीने) मध्ये 7090.68 कोटी रुपये अतिरिक्त भार येईल.

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे ही वाढ आहे.

N.Sapre/S.Kane/D.Rane