Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केरळ मंदीर आग दुर्घटना हृदयविदारक आणि धक्कादायक, लवकरच केरळला पोहचणार – पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या कोल्लम जिल्हयातल्या मंदीरात घडलेल्या आग दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्देवी दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण लवकरच केरळला पोहोचत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

“कोल्लम मधल्या मंदीरात झालेली आग दुर्घटना हृदयविदारक आणि धक्कादायक आहे. मृत व्यक्तींच्‍या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आणि जखमी व्यक्तींसाठी प्रार्थना.

मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्याशी कोल्लम येथील मंदिरातल्या आगीबाबत बोललो. गंभीर रित्या जखमी झालेल्यांना हेलिकॉप्टरद्वारे त्वरीत हलवण्यासाठी व्यवस्था करत आहे.

मंत्रीमंडळातील माझे सहकारी आणि आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी बोलून त्यांना कोल्लम येथील आग दुर्घटनेच्या स्थळी पोहोचायला सांगितले आहे.

कोल्लम येथील आग दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मी लवकरच केरळला पोहोचत आहे” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai