पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, कोईम्बतूर येथील पंकजा मिल्स येथील एअर-इंडियाच्या मालकीच्या 0.99 एकर आकाराचा भूखंड 19-81 कोटी रुपये एवढया विचाराधीन किंमतीला विकण्यासाठी, मान्यता देण्यात आली.
गेली अनेक वर्ष एअर-इंडियाला तोटा होत असून, बिगर करपात्र महसूल वाढवण्यासाठी, एअर इंडियाच्या वापरात नसलेल्या अ-चल स्थावर मालमत्ता विकून किंवा भाडयाने देऊन तसेच संयुक्त उपक्रमाद्वारे निधी उभा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा एक भाग म्हणून हा भूखंड एनबीसीसीला विकण्यात येणार आहे.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai