पीएम्इंडिया
भारताचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नॅशनल क्वालिफिकेशन ॲथॉरिटी यांच्यात 10-2-2016 ला झालेल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळानं पूर्वलक्षी प्रभावानं मान्यता दिली आहे. या सामंजस्य करारामुळे कौशल्य विकास आणि पात्रतेसंदर्भात दोन्ही देशातलं सहकार्य दृढ होणार आहे. याशिवाय कौशल्यविकास तसंच युएईमधल्या नोकरीत युवकांची भर्ती व्हायला या सामंजस्य करारामुळे चालना मिळणार आहे.
N. Chitale / S.Tupe / M. Desai