Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

क्वालालंपूरमधील पंतप्रधानांच्या भेटी (23 नोव्हेंबर 2015)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (23 नोव्हेंबर 2015) मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी मोहम्मद नबीब बिन तुन अब्दुल रज्जाक यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांना संबोधित केले. यामध्ये पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध अधिक बळकट करण्यावर जोर दिला ज्यामध्ये सागरी सुरक्षा अधिक प्रगत आणि क्षेत्रीय आप्तकालीन प्रतिसाद वृध्दिगंत करण्याचा समावेश आहे.

दोन्ही नेत्यांनी एकत्रित क्वालालंपूरमधील लिटील इंडिया येथे “तोरण द्वार”चे उद्‌घाटन केले. सांची स्तूपाच्या तोरण द्वारापासून प्रेरीत होऊन हे द्वार उभारण्यात आले आहे. आपला मलेशिया दौरा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असून तोरण द्वाराचे संयुक्त उद्‌घाटन ही घटना देखील त्यातीलच एक आहे असे पंतप्रधान म्हणाले. हे द्वार म्हणजे केवळ एक दगडाची कलाकृती नसून दोन देशांमधील सांस्कृतिक संबंधांचे दर्शन घडवणारा एक सेतू आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी भगवान गौतम बुध्दांचे स्मरण केले ज्यांनी शतकापूर्वी आशियामध्ये शांतीचा संदेश दिला होता.

आर्थिक संबंध वृध्दिंगत करण्याच्या उद्देशाने मोदींनी मलेशियातील कॉर्पोरेट विश्वातील दिग्गज मंडळींची देखील भेट घेतली. भारत आज जगातील सर्वात वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था आहे. राजकीय दृष्टया भारतातील स्थिती स्थिर असून येथे गुंतवणूकीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भारताला आवश्यक असलेला अनुभव आणि मार्गदर्शन मलेशियाच्या सीईओंकडे असल्याने हा एक उत्तम मिलाप आहे. यावेळी मलेशियातील सीईओनी अन्नप्रक्रिया, तेल आणि वायू व उड्डाण या क्षेत्रांसह भारतीय अर्थव्यवस्थांच्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शवली आहे.

S.Mhatre/S.Tupe/N.Sapre