पीएम्इंडिया
महामहीम पंतप्रधान दातो श्री मोहम्मद नजीब
उपस्थित मान्यवर,
क्वालांलपूर या सुंदर शहरातील परिषदांबाबत आपण केलेल्या अभूतपूर्व व्यवस्थापनाबद्दल, पंतप्रधान नजीब, आणि मलेशियातील जनता आपल्या कौतुकाला पात्र आहे.
पूर्व आशिया परिषदेच्या कार्यपध्दतीच्या तुम्ही घेतलेल्या आढाव्याबद्दलही मी तुमचे अभिनंदन करतो.
ही एक ऐतिहासिक परिषद आहे. 2025 पर्यंतचा मार्ग निश्चित करण्यात आणि आसियान समुदायाचे ध्येय प्रत्यक्षात अनुसरण्यासाठी आम्ही आसियान सदस्यांचे कौतुक करतो.
विस्तृत प्रादेशिक एकात्मकता आणि सहकार्याचे ध्येय साकार करण्यासाठी आसियान महत्त्वाची आणि मध्यवर्ती भूमिका निभावेल, अशी आमची अपेक्षा आहे.
दहशतवाद ही या भागाच्या परिघातील समस्या असल्याचा विचार आम्ही या व्यासपीठावर अनेकदा मांडला आहे. पॅरीस, अंकारा, बैरुट आणि मालीमधील निर्घृण दहशतवादी हल्ले, रशियाच्या विमानावरील हल्ले हे, दहशतवादाची छाया ही लक्ष्यांची निश्चिती करण्यात आणि भरती करण्याबाबत याची आपल्या समाजांच्या आणि आपल्या विश्वासावर पसरली आहे, विषण्ण करणारी आठवण आहे. राजकीय पारडयात न तोलता, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आपण नवे जागतिक धोरण निश्चिती आणि नवे डावपेच आखलेच पाहिजेत. कुठल्याही देशाने दहशतवादाचा वापर करता कामा नये अथवा दहशतवादाला पाठिंबा देता कामा नये. कुठल्याही गटांदरम्यान कोणताही भेदभाव नाही. कुठलीही आश्रयस्थान नाही. कुठलाही निधी नाही. शस्त्रास्त्रांची कुठलीही उपलब्धता नाही. पण आम्हाला आमच्या समाजाच्या अंतर्गत आणि आमच्या युवाशक्ती सोबत काम करायचे आहे. दहशतवादापासून धर्माला वेगळे करण्याच्या कटीबध्दतेचे मी स्वागत करतो आणि प्रत्येक धर्माची व्याख्या असणाऱ्या मानवी मूल्यांचा प्रसार करण्याच्या प्रयत्नांचेही मी स्वागत करतो.
पॅरिसमधील हवामान बदल विषयक परिषद केवळ काहीच दिवस दूर आहे. तिथे हवामान बदल विषयक संतुलित आणि ठोस फलित निश्चित व्हावे यासाठीच आपण केवळ एकत्र येता कामा नये, तर दहशतवादाच्या समोर आपण माघार घेणार नाही असा स्पष्ट संदेश देण्यासाठी, आपण एकजूटीने उभे राहण्याचीही गरज आहे.
महामहीम,
18 महिन्यांपूर्वी माझे सरकार सत्तेत आल्यापासून इतर भागांपेक्षा आशिया पॅसिफिक आणि हिंदी महासागरात भारताचे मोठे कार्य दिसून आले आहे. भारतासाठी आणि जगासाठी या भागाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या भारताच्या राष्ट्रीय सहमतीचे हे प्रतिबिंब आहे.
जागतिक पातळीवरील आव्हाने आणि अनिश्चितता यांचे उदाहरण म्हणून या भागाकडे पाहिले जाते. पण आपला विभाग हा स्थिर, शांततापूर्ण आणि भरभराटीच्या भविष्यासाठी अनेक स्थित्यतरांतून मार्गक्रमण करतो आहे.
या विभागाच्या एकत्रित भविष्याला आकार देण्यासाठी पूर्व आशिया परिषद हे महत्वपूर्ण व्यासपीठ आहे. सर्वप्रथम सुरक्षा आणि सहकार्य यासाठी खुल्या, पारदर्शक, संतुलित आणि सर्वंकष प्रादेशिक आराखडा विकसित करण्याला पूर्व आशिया परिषदेने समर्थता देणे सुरुच ठेवले पाहिजे. आंतरराष्ट्रीय नियम आणि अटींचे पालन करुन आपण आपली एकत्रित कटीबध्दता अधिक दृढ करायला हवी.
दुसरे म्हणजे, सागर हे आपल्या भरभराटीचे आणि सुरक्षेचे मार्ग आहेत. 1982 च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सागरी कायद्याबाबतच्या परिषदेसह, स्वीकार केलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, वाहतूकीचे स्वातंत्र्य आदी बंधनरहित व्यापार याबाबतच्या आसियान कटिबध्दतेचा भारत स्वीकार करतो. शांततामय मार्गानेच प्रादेशिक विवाद सोडवले गेले पाहिजेत.
यूनसीएलओच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेशाने नुकतीच आपली सागरी सीमा निश्चित केली आहे. दक्षिण चीन समुद्रातील विवादांशी संबंधित सर्वजण दक्षिण, चीन समुद्राबाबतची आचारसंहिता जाहीरनामा आणि त्याच्या अंमलबजावणीबाबतची मार्गदर्शक तत्वे यांच्याच आधारे कार्य करतील, अशी भारताला आशा आहे. सहमतीच्या आधारावरील आचारसंहिता स्वीकारण्यासाठी संबंधितांनी अधिक जोमाने प्रयत्न केलेच पाहिजेत.
तिसरे म्हणजे सायबर सुरक्षेबाबत आपण कटिबध्द होण्याची आणि अधिक सहकार्याची गरज आहे. या संदर्भातील काही अटींबाबत आपण कार्य करण्याची गरज आहे. अंतरीक्ष देखील सुरक्षेसाठी चिंतेचा विषय बनत आहे.
आसियान आणि भारत यांच्यात समान सागरी आणि भूमी सीमा आहेत. आसियन आणि इतर पूर्व आशियाई देशांसोबतची द्विपक्षीय सुरक्षा भागीदारी भारत अधिक दृढ करतच राहील. आसियानच्या नेतृत्वाखालील सुरक्षा विषयक चर्चा आणि भागीदारीच्या व्यासपीठावर आम्ही सक्रीय सहभागी राहू.
चौथे म्हणजे, आपण संतुलित आणि विस्तृत पाया असणारी प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी लवकरात लवकर निश्चित करण्यासाठी आपण काम केले पाहिजे. यामुळे या विभागातील एकात्मिक आर्थिक समुदायाचा पाया घातला जाईल.
अखेरचे म्हणजे, पूर्व आशिया परिषदेचा केंद्रबिंदू हा आर्थिक सहकार्य आहे. आपल्या सहकारी देशांच्या प्रयत्नांना भारत नेहमीच पाठिंबा देत राहील. आप्तकालीन व्यवस्थापन आणि ट्रॉमा केअर आणि नर्सिंग यासाठी व्हर्च्युअल नॉलेज पोर्टल स्थापित करण्यासाठी भारत पुढाकार घेत आहे. जागतिक दर्जाचे ज्ञान आणि शैक्षणिक केंद्र म्हणून नालंदा विद्यापीठ आकार घेत आहे.
या विभागातील धोरणात्मक राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा विषयक चितांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या पूर्व आशिया परिषदेच्या दृष्टीकोनाचा मी स्वीकार करतो.
धन्यवाद.
J.Patnakar/S.Tupe/N.Sapre
World leaders are present at the East Asia Summit in Kuala Lumpur. Watch. https://t.co/GsY0hYOmHN
— PMO India (@PMOIndia) November 22, 2015
Glimpse from the East Asia Summit. pic.twitter.com/QRE5rHPsro
— PMO India (@PMOIndia) November 22, 2015