Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

क्वालालंपूर मलेशिया येथे स्‍वामी वि‍वेकानंद पुतळयाच्‍या अनावरणाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

क्वालालंपूर मलेशिया येथे स्‍वामी वि‍वेकानंद पुतळयाच्‍या अनावरणाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

क्वालालंपूर मलेशिया येथे स्‍वामी वि‍वेकानंद पुतळयाच्‍या अनावरणाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


बंधु आणि भगिनींनो,

आताच मला सुप्रियानजी सांगत होते, या परिसरात तर विवेकानंदांची प्रतिमा आपण स्‍थापन केली आहे पण आमच्‍या मन-मंदिरात, हृदयात विवेकानंदाची प्रतिमा तुम्‍ही स्‍थापना करा असे कुणी सांगितले म्हणून, आपण तसे करू शकाल, असे मला वाटत नाही. आपल्‍या आत विवेकानंद प्रवेश करू शकत नाहीत किंवा कोणाच्‍याही प्रवचनाने विवेकानंद आपल्‍यात शिरू शकत नाही. विवेकानंद केवळ एका व्‍यक्‍तीचे नाव, व्‍यवस्‍थेची ओळख नसून एका प्रकारे हजारो वर्षापासून असलेल्‍या भारतीय आत्‍म्‍याची ओळख आहे.

वेदापासून तर विवेकानंदापर्यंत आपला सांस्‍कृतिक वारसा मोठा आहे व उपनिषदांपासून उपग्रहापर्यंत आपल्‍या आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक विकासामध्‍ये आपली वाटचाल सुरू आहे.

उपनिषदांपासून उपग्रहांपर्यंत जरी आपण पोहचले असु तरी आपला मुळ पिंड आपली आत्‍मा आहे, जो खऱ्‍या अर्थाने आपली ओळख आहे. जर आपण त्‍याला कायम ठेवण्‍यात यशस्‍वी झालो तर विवेकानंदाना आपल्‍यामध्‍ये जीवंत ठेवण्‍याचा एका अर्थाने आपण प्रयत्‍न करत आहोत.

रामकृष्‍ण परमहंस व नरेंद्र, या दोघांबद्दल आपण माहिती जमवली तर विवेकानंदांना समजण्‍यासाठी सुविधा होईल.

नरेंद्रानी कधी गुरूंचा शोध घेतला नाही, त्‍यांना सत्याचा शोध घ्‍यायचा होता, ईश्‍वराचा नाही त्‍यांच्‍यानुसार परमात्‍मा नावाची कोणती गोष्‍ट असू शकत नाही, ईश्‍वर नावाचा कोणी व्‍यक्‍ती नसेल, या सत्याचा शोध घेण्‍यासाठी ते झटत होते.

रामकृष्‍णसुध्दा शिष्‍यांच्‍या शोधात नव्‍हते. त्यांच्‍या मते, गुरु-शिष्‍य परंपरेची भावना त्यांच्‍या आश्रमात प्रस्‍थापित व्‍हावी व ती चालवण्‍यासाठी कोणी तरी शिष्‍य मिळावा, अशी त्‍यांची मनोकामना नव्‍हती.

एक गुरु ज्‍याला शिष्‍याचा शोध घेण्‍याची, किंवा एखादया शिष्‍याला आपल्‍या गुरूचा शोध घेण्‍याची गरज नव्‍हती, पण तुम्‍ही कमाल बघा, एक जण सत्याला समर्पित होता, तर दुसरा सत्‍यांच्‍या शोध घेत होता व त्याच सत्याच्या शोधात दोघांना मिळवून आणले.

या गोष्‍टी आपण समजून घेतल्‍या तर सत्‍याचा शोध काय असु शकतो, सत्यांच्‍या मार्गावर चालणे किती कठीण असते व त्यातून काय साध्‍य होते, हे सर्व आपण विवेकानंदाच्‍या आयुष्‍यातुन समजु शकतो.

आपण विवेकानंदाच्‍या कालखंडाचा ज्‍यामध्‍ये धर्माचा, पुजा-प्रथेचा, रूढी-परंपराचा, धर्मगुरूंच्‍या, धर्मग्रंथाच्‍या महानतेचे वर्चस्‍व होते, त्या कालखंडाचा विचार केल्‍यास त्‍या काळात एक युवक या सर्व परंपरापासून दुर जाण्‍यासाठी गोष्‍ट करत असणार, अशी कल्‍पना पण आज कोणी करू शकत नाही.

ईश्‍वराजवळ तास-न-तास बसून राहिल्‍यास, पूजा-अर्चना, आरती, फुलहार, प्रसाद इत्‍यादी करून आयुष्‍यातील सर्व पापे धुऊन निघतात, मोक्षाची प्राप्ती व आनंदाची पराकाष्‍टा मिळते, असा समज बहुसंख्य वर्गाचा होता. या मा‍नसिकतेच्‍या विरुध्द विवेकानंद छातीठोकपणे, लोक-सेवा हीच ईश्‍वरसेवा असल्‍याचे सांगत होते. सामान्‍य माणूस जो तुमच्‍यासमोर जीवंत आहे, दु:खाने, वेदनेने ग्रस्‍त आहे, त्यांची सेवा करा, ईश्‍वर आपोआपच तुम्‍हाला भेटेल.

जेव्‍हा कलकत्‍त्‍यामध्‍ये काही युवकांनी त्‍यांना ईश्‍वरप्राप्‍तीच्‍या मार्गाबद्दल विचारले, तेव्‍हा त्‍यांनी सांगितले की, तुम्‍ही हे सर्व सोडून फुटबॉल खेळा, मजेत फुटबॉल खेळून आपले सर्वस्‍व त्‍यात झोकून दया, तुम्‍हाला तुमचा मार्ग सापडेल. या काळी, आपण गुलामगिरीत होतो. भारताला स्‍वातंत्र्य मिळेल अशी कल्‍पना पण कोणी करत नव्‍हते. पण स्‍वामी विवेकानंद एक दीर्घ दृष्‍टी असलेले व्‍यक्‍तीमत्‍व होते व त्यांनी आपल्‍या हयातीतच असे सांगितले की, त्यांच्‍या डोळयासमोर भारतमाता विश्‍वगुरूच्‍या, ओजस्‍वी रूपात उभी आहे व तो दिवस आता जवळ येत आहे. ही त्‍यांची भावना त्‍यांच्‍या जिवंतपणी त्यांनी बाळगली व सर्व भारतास प्रेरित करण्‍याचे काम त्यांनी केले.

तो काळ असा होता, ज्‍यामध्‍ये अध्यात्‍म प्रधान जीवन केवळ भारतमध्‍येच नाही तर आशियातील सर्व देशांमध्‍ये समाविष्‍ट होते. दुसऱ्‍या बाजुला, पाश्चिमात्‍य विचार हा अर्थप्रधान होता. अध्यात्‍म प्रधान जीवन आणि अर्थप्रधान जीवन यामध्‍ये शेकडो वर्षापासून संघर्ष चाललेला होता. अर्थ प्रधान जीवनाने, अध्‍यात्‍म प्रधान जीवनाला बाजूला सारले अर्थ प्रधान जीवन, जन-सामान्‍यांचा इच्‍छा-आकाक्षांचा एक केंद्रबिंदु बनले. या काळात, स्‍वामी विवेकानंदानी 30-32 वर्षाचे असतांना, मोठया हिमतीने सर्व जगाला आध्‍यात्मिकतेचा संदेश देण्‍याचे सामर्थ्‍यशाली कार्य, पाश्चिमात्‍य भूमीवर केले. पहिल्‍यांदाच या महापुरुषाने आशियातील आध्‍यात्मिक ताकदीला, सर्व जगाशी ओळख करून दिली व सर्व जगाला त्या भूमीची एक वेगळी विचारधारा, संस्‍कार व विश्‍वाला काही वेगळे देण्‍याची भावना, या साऱ्‍यांशी अवगत करून देण्‍याचे कार्य स्‍वामी विवेकानंदानी केले. काल मी येथे दक्षिण आशिया शिखर परिषद, आशियान परिषदेमध्‍ये आलो, तेव्‍हा “एक आशिया”ही संकल्‍पना पुढे आली.

आज जो स्‍वर घुमत आहे, त्यामध्‍ये आर्थिक, राजनैतिक, सरकारी व्यवस्थेच्या वाटाघाटी इत्यादींचा विचार आहे. पण खूप कमी लोकांना हे माहित असेल की, आध्‍यात्मिक पृष्‍ठभूमीवर स्‍वामी विवेकानंदानी सर्वप्रथम “एक आशिया” या संकल्‍पनेचा प्रचार केला होता. मी याप्रसंगी एका जुन्या घटनेची आठवण आपणास करून देतो.

ज्यावेळी स्वामी विवेकानंदानी पुर्वेची व आशियाची, पाश्चिमात्यांना ओळख करून दिली, तेव्हा विचारवंत व तत्ववेते स्वामी विवेकानंदाप्रती प्रेरित झाले. यामध्ये जपानचे ओकाकुरा,कार्निजो भारताचे रविंद्रनाथ टागोर, महर्षी अरबिंदो, आनंद कुमारस्वामी व विनोय सरकार हे होते. ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंदाना जपान येथे आमंत्रित केले व 300 रुपयाचा एक धनादेशही पाठवला.ते कलकत्त्याला आले आणि स्वामी विवेकानंदाची भेट त्यांनी 1 फेब्रुवारी,1902 ला घेतली व ते दोघे बोधगयेला गेले. ओकाकुरा आशियाई तत्वाचे एक प्रतिक होते. त्यांच्या “पुर्वेकडील आदर्श” या पुस्तकाचे हस्तलिखित, स्वामी विवेकानंदांच्या पाश्चिमात्य देशातील परमशिष्या भगिनी निवेदिता यांनी संपादीत केले होते. त्यातील सर्वात पहिले वाक्य खुप महत्वाचे आहे, ते म्हणजे “आशिया एक आहे” आशियाची एकता ही संकल्पनाच मुळ स्वामी विवेकानंदांनी मांडली. ओकाकुरा त्यांच्या पुढील पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंदांच्या धर्मसंसदेला दिलेल्या भाषणाचे अनुकरण करत “ आशियातील बंधु व भगिनींनो” अशी सुरुवात आपल्या पुस्तकांमध्ये केली.

मी हे यासाठी सांगत आहे की, या प्रकारे स्वामी विवेकानंदांच्या प्रभावाखाली असणा-या चिंतकांनी/तत्ववेत्त्यांनी स्वामी विवेकानंदांजवळील’ आशिया एक आहे’ हा मंत्र प्राप्त केला. आज 100 वर्षानंतर, राजनैतिक कारणांमुळे आशियाची चर्चा होत असली तरी, त्या काळी स्वामी विवेकानंद अध्यात्मिक एकात्मतेच्या आधारावर या जगाला संकटातून बाहेर काढण्याच्या मताचे होते. आजही, जग ज्या दोन संकटात सापडले आहे,त्या संकटातुन मार्ग काढण्याची क्षमता आशियाच्या भुमीमध्येच आहे.

त्यामुळेच हे विश्व वातावरण बदल, वैश्विक तापमान. दहशतवाद या गोष्टीची चर्चा करत आहे. याच भूमीवरून भगवान बुद्‌धांचा, हिंदुत्वाचा संदेश मिळाला व “एकम सत्‌ , विपरा बहुधा विधंती” (सत्य एक आहे, विद्वान त्याचे वेगळे मार्ग सांगतात) या मंत्राचा उद्‌घोष या भूमीवर झाला. या मंत्रामुळे सर्वांना एकत्र जोडून ठेवण्याचे सामर्थ्य मिळते. जेव्हा दहशतवादाची चर्चा होते, तेव्हा तो इतरांपेक्षा चांगल्या असण्याची कल्पना नसते. प्रत्येक सत्याला स्विकारल्यानंतर विवादासाठी काही वाव नसतो. जेव्हा विवादासाठी वाव नसतो, तेव्हा संघर्षाची भावना नसते व जेव्हा संघर्ष नसतो, तेव्हा दहशतवादाच्या मार्गाला जाण्याचे काही कारण नसते.

आज जग, जागतिक वातावरण बदलाची चर्चा करते. आम्ही तर असे लोक आहोत जे वनस्पतीमध्ये ईश्वर शोधतो. आपण कितीही ईश्वराची कल्पना केली, तरी प्रत्येक ईश्वरासोबत काही ना काही नैसर्गिक जीवन जोडलेले आहे, कोणत्या ना कोणत्या वृक्षाची साधना, पशु-पक्ष्यांचे पालन इत्यादी त्याच्याशी निगडीत आहे. हा संदेश आमच्या परंपरेमध्ये रुजला आहे. आम्ही निसर्गाचे शोषण करणा‌ऱ्‍यांच्या पक्षात नसून आम्ही निसर्गासोबत मैत्रीपुर्ण सहअस्तित्वाचे पुरस्कर्ते आहोत. हीच संस्कृती आपल्याला वातावरण बदलापासून मानव समाजास वाचवू शकेल.

माझ्या मते, स्वामी विवेकानंदांनी दाखविलेल्या या मार्गावर आपण चाललो तर आपल्यामध्ये नव्याने स्वामी विवेकानंद प्रस्थापित करण्याची गरज भासणार नाही, त्यांचा संदेश आपण अ‍नुसरला तर येणाऱ्‍या शतकांमध्ये मानवजातीच्या कल्याणात आपले योगदान राहील.

आज येथे योगावरील एका पुस्तकाचे विमोचन करण्याची संधी मला मिळाली. आमच्या सरकारचे श्री. शाहू यांनी सरकारी अधिकारी असूनसुध्दा, योगाबद्दल त्यांच्या समर्पणाच्या उद्देशाने योगावरील हे पुस्तक येथील स्थानिक भाषेत लिहिले. मला त्यांच्या पुस्तकाचे विमोचन करतांना आनंद झाला. आज जग योगाप्रती आकर्षित झाले असून सर्वजण तणाव मुक्त-जीवनाचा मार्ग शोधत आहे व त्या सर्वांना योग हाच एक मार्ग दिसतो व सर्वजण तोच मार्ग पत्करत आहे

संयुक्‍त राष्‍ट्रसंघाने आंतरराष्‍ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्‍याचे ठरविले. जगातील 177 देशांनी त्‍यांचे सहआयोजन केले. मानव जाती मानसिक समाधानाचा मार्ग शोधत आहे, समग्र स्‍वास्‍थ संरक्षणाचा मार्ग शोधत आहे, तेव्‍हा त्यांना योगाच्या माध्‍यमातून दिवसातील अर्धा पाऊण तास जरी दिला तरी आपले मन, बुध्दी व शरीराला एक दिशा मिळते, असा विश्‍वास आहे. आज आपल्‍यापुढे जगाला योग काय आहे, हे समजवण्‍याचे नाही तर योग शिक्षकाची जगाकडून होणारी मागणी पूर्ण करण्‍याचे आवाहन आहे. आज संपुर्ण योगविद्या योग्यरितीने शिकवणारे, त्‍यांचा हेतुपूर्वक मागोवा घेऊन आधुनिक भाषेत त्याचा प्रचार भावी पिढयापर्यंत घेऊन जाणारे व स्‍वत:च्‍या आयुष्‍यात त्‍याचा अंतर्भाव करणारे अधिकांश शिक्षक आपल्‍याला तयार करायचे आहे. हे त्‍यांच्‍या सवयीचा भाग असणारे असावेत, व्‍यावसायिक नाहीत. दिवसात आपण 50 काम करतो, एका तासात जो पण योग शिकायला येणार त्‍याला आम्‍ही शिकवणार.

हे सर्व वातावरण आपल्‍याला आशियात आणायचे, जी जगाची पण अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्‍यासाठी योगशिक्षक जगाला दयायचे आहेत. मी स्वामी सुपरयानंदाचे आभार मानतो, मला आज या पवित्र स्‍थानी येण्‍याची, विवेकानंदाच्‍या पुतळयाचे अनावरण करण्‍याची संधी मिळाली. मला या भूमीवर येणाऱ्‍या जगातील सर्व लोकांना प्रेरणा मिळणार, असा विश्‍वास वाटतो. या शुभेच्‍छांसह,तुम्‍ही सर्वांना खुप-खुप धन्‍यवाद.

D.Wankhede/S.Tupe/B.Gokhale