सागरी प्रवास करणाऱ्या खलाशांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रशिक्षण, प्रमाणन आणि टेहळणी याविषयीच्या नियमनात बदल करून त्यानुसार परराष्ट्रांशी करावयाचा कराराचा मसुदा जहाजबांधणी संचालनालयाने तयार केला आहे. या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. या मसुद्यानुसारच एकपक्षीय/द्विपक्षीय प्रमाणपत्रं खलाशांना दिली जातील. 1978 साली झालेल्या या करारात सुधारणा करण्यात आली असून सुधारित मसुद्यांचा केंद्र सरकारच्या जहाजबांधणी महासंचालनालय आणि परदेशामध्ये हा करार होऊ शकेल, त्याला जहाजबांधणी मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची मंजुरी आवश्यक असेल.
लाभ
एकपक्षीय सामंजस्य करारामुळे भारताच्या जहाजबांधणी महासंचालनालयाने भारतीय खलाशांना दिलेले प्रमाणपत्र इतर देशातही मान्य होऊ शकेल. त्यासाठी त्या संबंधित देशातल्या प्रमाणपत्राची गरज पडणार नाही.
यामुळे भारतीय खलाशी संबंधित देशांच्या जहाजांमध्येही रोजगार मिळवण्यास पात्र ठरतील. त्याशिवाय द्विपक्षीय सामंजस्य करारामुळे भारत आणि संबंधित देश यांच्यात खलाशांचे सागरी शिक्षण आणि प्रशिक्षण, क्षमता, प्रशिक्षणविषयक कागदपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रांना दोन्ही देशांकडून मान्यता मिळू शकेल. या करारामुळे खलाशांना दोन्ही देशातल्या जहाजांवर रोजगार मिळवता येईल.
**********
M.Chopade/R.Aghor/P.Kor