Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतल्या सहभागी खेळाडूंना पंतप्रधानांकडून शुभेच्छा


पुण्यात आजपासून सुरू झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पुण्यात आजपासून सुरू झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व युवा मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही स्पर्धा उत्तम क्रीडा नैपुण्याचे दर्शन घडविणारी ठरावी आणि आपल्या युवकांना त्यांची क्रीडा स्पर्धा विषयीची स्वप्नं पूर्ण करण्यासाठीचा मंच ठरावी. अधिक खेळ, उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्त राष्ट्र! पाच मिनिटे आणखी म्हणजे देशाची तंदुरुस्ती वाढविण्यासाठी केलेला मोठा प्रयत्न आहे. नामांकित खेळाडू आपल्या अनुभवाविषयी बोलत आहेत आणि मैदानावर अधिक वेळ देत आहेत हे पाहणे आनंदाची बाब आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/N.Chitale/P.Kor