Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गरीब कल्याण आणि मानवी सक्षमीकरणावर केंद्रित असलेल्या 12 वर्षांच्या परिवर्तनकारक उपक्रमांना पंतप्रधानांनी केले अधोरेखित


नवी दिल्ली, 8 जून 2026

गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या परिवर्तनांच्या केंद्रस्थानी गरीब आणि शोषितांचे कल्याण राहिले आहे, असे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केले. सरकारने नेहमीच अंत्योदयाची प्रेरणा घेतली आहे आणि दशकांपासून मागे राहिलेल्या लोकांपर्यंत विकासाचे फायदे पोहोचवणे हाच सरकारचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

जनधन खाती आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) पासून ते स्वच्छ भारत, पीएम आवास योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत आणि इतर अनेक उपक्रमांपर्यंतचा प्रत्येक उपक्रम हा लोकांना सन्मान आणि संधी सुनिश्चित करण्याच्या एका साध्या उद्दिष्टाने प्रेरित आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

गरिबांचे जीवनमान उंचावण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे, असे मोदी यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे गळती कमी झाली आहे, कार्यक्षमता सुधारली आहे आणि प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. अशा प्रकारे गरीब कल्याणाचा हा प्रवास मानवी सक्षमीकरणाच्या दिशेने आणि ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक सामूहिक चळवळ बनला आहे, असे त्यांनी नमूद केले.

एक्सवरील पोस्ट्सच्या एका मालिकेत पंतप्रधानांनी सामायिक केलेः

“गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या परिवर्तनांच्या केंद्रस्थानी गरीब आणि शोषितांचे कल्याण राहिले आहे. आम्ही नेहमीच अंत्योदयापासून प्रेरणा घेतली आहे आणि दशकांपासून मागे राहिलेल्या लोकांपर्यंत विकासाचे फायदे पोहोचावेत हाच आमचा प्रयत्न राहिला आहे.  जनधन खाती आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) पासून ते स्वच्छ भारत, पीएम आवास योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत आणि इतर अनेक उपक्रमांपर्यंतचा प्रत्येक उपक्रम हा लोकांना सन्मान आणि संधी सुनिश्चित करण्याच्या एका साध्या उद्दिष्टाने प्रेरित आहे.

#12YearsOfGaribKalyan”

“गरिबांचे जीवनमान उंचावण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ही बाब अतिशय आनंददायी आहे. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली आहे, कार्यक्षमता सुधारली आहे आणि प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. याच प्रकारे गरीब कल्याणाचा हा प्रवास मानवी सक्षमीकरणाच्या दिशेने आणि आपल्या ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक सामूहिक चळवळ बनला आहे.

#12YearsOfGaribKalyan”

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai