Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आसाममधील पूरस्थितीचा राज्यातील खासदारांसमवेत घेतला आढावा


नवी दिल्‍ली, 28 जुलै 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील खासदारांची बैठक आयोजित केली आणि राज्याच्या  विविध भागांतील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

पुरामुळे बाधित नागरिकांना सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार आसाम सरकारसमवेत काम करत  असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

X वरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले:

“आसाममधील खासदारांची भेट घेतली आणि राज्याच्या विविध भागातील पूर स्थितीचा आढावा घेतला.

पुरामुळे बाधित नागरिकांना सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार आसाम सरकारबरोबर काम करत आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.”

 

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai