पीएम्इंडिया
गुजरातच्या अहमदाबाद येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. मोदी म्हणाले की स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.
मोदी यांनी पीएमएनआरएफतर्फे प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
गुजरातच्या अहमदाबाद येथील फटाक्यांच्या कारखान्यातील अपघातात जीवितहानी झाल्याचे ऐकून अत्यंत दुःख झाले. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमींच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.
प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi
Extremely saddened to hear about the loss of lives due to a mishap at a fireworks factory in Ahmedabad, Gujarat. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. Praying for the speedy recovery of the injured. The local administration is providing all possible…
— PMO India (@PMOIndia) July 18, 2026
***
राधिका अघोर/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]