Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्‍ली, 2 जून 2026

 

गुजरात मधील सुरत जिल्ह्यात झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी या अपघातातील मृताच्या वारसाला ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’ (पीएमएनआरएफ) मधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

‘X’ वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,

“गुजरातच्या सुरत जिल्ह्यात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होवोत हीच प्रार्थना. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासन सर्व संबधितांना सर्वतोपरी  मदत करत आहे.

प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील: PM”

 

* * *

निलिमा चितळे/सविता म्‍हस्कर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai