Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरु गोविंद सिंह यांच्या 350व्या प्रकाशपर्वानिमित्त गुरु गोविंद सिंह यांचे पंतप्रधानांकडून स्मरण


दहावे शिख गुरु, गुरु गोविंद सिंह यांच्या 350 व्या प्रकाशपर्वानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.

350 वे प्रकाशपर्व आपण साजरे करत आहोत. असामान्य शौर्य आणि अफाट बुद्धीमत्ता यांचे ते मुर्तीमंत प्रतिक होते. त्यांचे शौर्य आणि शिकवण पिढ्यान पिढ्यांसाठी स्फुर्तीदायी राहील, अशा श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्यासमोर आपण नतमस्तक होत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

श्री गुरु गोविंद सिंहजी यांचा समानतेच्या शक्तीवर विश्वास होता. कोणत्याही स्वरुपातल्या सामाजिक भेदभावाला त्यांचा विरोध होता. न्याय आणि सचोटीसाठी ते सदैव पूजनीय राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane