Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गृहनिर्मिती क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातल्या सामंजस्य कराराची मंत्रिमंडळाला माहिती


भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात गृहनिर्मिती क्षेत्रातल्या सहकार्याबाबत फेब्रुवारी 2019 मधे झालेल्या सामंजस्य कराराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली.

गृहनिर्माण क्षेत्रातल्या तंत्रविषयक सहकार्याला या करारामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. गृहनिर्माण आणि पायाभूत प्रकल्पातल्या कंपन्या आणि अधिकारी यांचा सहभाग वृद्धींगत व्हायलाही, यामुळे मदत होणार आहे. गृहनिर्मिती विकास क्षेत्रात संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन तसेच आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान हस्तांतरण आणि विकास यामधे ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण यांना प्रोत्साहन मिळणार आहे.

M.Chopade/N.Chitale/D. Rane