पीएम्इंडिया
माझे सहकारी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा, इथिओपियाचे आरोग्यमंत्री केसेटेबिरहान अदमासू, या परिषदेत सहभागी होणाऱ्या देशांचे मंत्री, सामाजिक संघटना, खाजगी क्षेत्र, प्रसार माध्यमे, शैक्षणिक जगतातल्या व्यक्ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वक्ते, आणि आदरणीय प्रतिनिधी, माझे सरकार या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सर्व सह आयोजकांच्या वतीने ग्लोबल कॉल टू ॲक्शन समिट 2015 मध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.
ग्लोबल कॉल टू ॲक्शन समिट पहिल्यांदाच अमेरिकेबाहेर होत आहे ही महत्त्वाची बाब आहे. माझ्या सरकारला या परिषदेचे आतिथ्य करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. या परिषदेसाठी दूरदूरवरुन प्रवास करुन आलेल्या सर्व प्रतिनिधीचे, भारतात, नवी दिल्लीत मी मन:पूर्वक स्वागत करतो. तुम्ही सर्व येथे आल्यामुळे मला आनंद झाला आहे.
दोन दिवसांच्या या परिषदेत सहभागी राष्ट्रांनी माता आणि बाल आरोग्य या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे यश या दोन दिवसीय परिषदेत साजरे केले जात आहे. माता आणि बालक यांचे मृत्यू टाळावे यासाठी संयुक्त नेतृत्वाला गती देण्याची या परिषदेची संकल्पना आहे. नियोजित उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने आपणा सर्वांसमोर असणाऱ्या एकत्रित आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी ही परिषद प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करुन देईल असा मला विश्वास आहे.
जगाला येत्या 15 वर्षांसाठी आपण कसा आकार देतो त्यावर भरभराट, आशादायी राष्ट्र आणि असुरक्षित-अस्वस्थता यांच्यातला फरक दर्शवेल. टाळता येण्याजोगे माता-बालमृत्यू रोखण्यासाठी असलेली कटिबद्धता दर्शविण्यासाठी 24 राष्ट्रे येथे एकत्र आली आहेत हे पाहून मला आनंद झाला आहे. या संधीचा लाभ घेऊन प्रगल्भ विचार करण्यासाठी आपणा सर्वांच्या कॉल टू ॲक्शन अर्थात ही कृतीसाठी साद आहे. सहस्त्रक विकास उद्दिष्टाकडून आपण शाश्वत विकास उद्दिष्टांकडे प्रवास करत आहोत. त्याचवेळी या कटू वास्तवाचीही नोंद घ्यायला हवी की जगात प्रतिवर्षी 289 हजार माता आणि पाच वर्षांखालील 6.3 दशलक्ष बालकांना आपला प्राण गमवावा लागतो. माता आणि शिशूंचे टाळता येणाऱ्या मृत्युपैकी 70 टक्के मृत्यू या शिखर संमेलनात भाग घेणाऱ्या 24 देशात होतात.
भारतात, 26 दशलक्ष जन्मणाऱ्या बालकांबरोबरच आव्हाने खडतर आहेत मात्र त्यावर मात करण्याची कटिबद्धताही आहे. आशेचा किरण हा आहे की यातले बरेचसे मृत्यू हे साध्या पण परिणामकारक आणि सिद्ध गोष्टींमुळे टाळता येणारे आहेत, आणि हेच या परिषदेचे महत्त्वाचे कारण आहे. या वर्षीच्या जानेवारीत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेले संयुक्त निवेदनही याचा महत्त्वाचा भाग आहे. टाळता येणारे माता आणि बालमृत्यू रोखावेत यासाठीच्या संयुक्त नेतृत्वाला गती देण्यालाही यावेळी मान्यता देण्यात आली होती.
माता आणि बाल आरोग्य क्षेत्रात अजून बरेच कार्य बाकी आहे हे लक्षात घेऊनही या क्षेत्राात जागतिक आघाडीवर काही महत्त्वाचे कार्यही झाले आहे. 1990 मध्ये भारतात पाच वर्षांखालील बालकांचे मृत्यू प्रमाण 126 होते तर त्यावेळी हे जागतिक सरासरी प्रमाण 90 होते. 2013 मध्ये भारतातले हे प्रमाण 49 झाले तर जागतिक सरासरी 46 पर्यंत आली. जागतिक सरासरी 1990 मध्ये 36 वरुन 2013 मध्ये केवळ 3 अंकानी कमी झाले. म्हणजेच भारतात पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर जगाशी तुलना करता वेगाने कमी झाला. याचाच अर्थ असा की या घटणाऱ्या दराचा कल आपण असाच कायम ठेवला तर सहस्रक विकास उद्दिष्ट गाठण्याच्या अगदी जवळ भारत पोहोचण्याची शक्यता आहे.
या महत्त्वाच्या बाबीशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोलिओवर विजय.
27 मार्च 2014 ला भारत पोलिओमुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले. 2009 मध्ये जगातल्या पोलिओ रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा जास्त पोलिओ रुग्णांना जबाबदार भारत ते पोलिओमुक्त भारत, येथपर्यंतचा प्रवास बाल आरोग्याप्रती भारताची कटिबद्धताच दर्शवितो.
भारताने प्राप्त केलेल्या आणखी एका यशाबद्दल मला सांगायचे आहे माता आणि नवजात शिशूसंबंधी धनुर्वातापासूनही भारत मुक्त झाला आहे. जगाने नियोजित केलेल्या डिसेंबर 2015 च्या आधीच ही मुक्ती मिळाली आहे. यामुळेच इतर उद्दिष्टेही, नियोजित कालमर्यादेपूर्वीच साध्य करायचा आत्मविश्वास आम्हाला मिळत आहे.
पोलिओ मुक्त तसेच माता आणि नवजात शिशूंबाबत धनुर्वातापासून मुक्तीसाठीचे अविरत प्रयत्न कायम राखत आणि निरनिराळया रोगांपासून वाचविणाऱ्या लसीची देशात व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने माझ्या सरकारने मिशन इंद्रधनुष हे अभियान राबवले जगातल्या मोठया लसीकरण मोहिमेतले हे एक आहे. अद्याप लसीकरण झाले नाही त्यांच्या लसीकरणाचा प्रतिवर्ष सध्याचा 1 टक्के दर वाढवून तो 5 टक्क्यांपेक्षा जास्त करण्याचे उद्दिष्टही या अभियानाचे आहे. यामुळे 2020 पर्यंत 90 टक्क्यांपेक्षा जास्त भागापर्यंत आपल्याला पोहोचता येईल मात्र सध्याचा दर कायम राहिला तर त्यासाठी आपल्याला 25 पेक्षा जास्त वर्ष लागण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजाराच्या लसीअभावी एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये याची खातरजमा आम्हाला करायची आहे.
माता आणि बाल आरोग्यासंदर्भातल्या जागतिक प्रयत्नात भारत नेहमीच सहभागी झालेला आहे. 2014 च्या जूनमध्ये जागतिक आरोग्य परिषदेतल्या जागतिक एव्हरी न्यूबॉर्न ॲक्शन प्लॅन (इएनएपी) नंतर लगेचच नवजात बालक मृत्यूदर कमी करण्याच्या जागतिक कटिबध्दतेला प्रतिसाद देणारा, भारत हा पहिला देश आहे. नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी आणि 2030 पर्यंत मृतजात शिशू प्रमाण एक आकडी होण्यासाठी सप्टेंबर 2014 मध्ये भारताने इंडिया न्यूबॉर्न ॲक्शन प्लॅन (आयएनएपी) सुरु केला. कॉल टू ॲक्शनला प्रथम भारताने साद देत RMNCH + A सुरु केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) द्वारे माता आणि बाल आरोग्य क्षेत्रात हे उल्लेखनीय यश प्राप्त करता आले. नागरी आणि ग्रामीण आरोग्य बाबींचा समावेश असलेले आणि कदाचित जगातला सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम असलेल्या या अभियानामुळे आरोग्य क्षेत्रात सुधारणा होत आहे.
गरोदर महिलांची आपल्या आरोग्य संस्थात सुखरुप प्रसूती व्हावी यावर सरकारचा कटाक्ष आहे. जननी सुरक्षा योजना (जेएसवाय) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आम्ही सुरु केला. याद्वारे सार्वजनिक आरोग्य संस्थात प्रसूतीसाठी येणाऱ्याना महिलांना थेट काही लाभ मिळण्याची योजना आहे. याचा परिणाम म्हणून सध्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रसूती या संस्थात होतात. यामुळे माता मृत्यूदर कमी व्हायला थेट मदत झाली आहे. न परवडणारा खर्च हा माहिलांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यातला अडथळा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. यावर मात करण्यासाठी आम्ही जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम (जेएसएसके) कार्यक्रम सुरु केला. याद्वारे सार्वजनिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचा तसेच त्यांच्या नवजात शिशूंना मोफत आरोग्य सेवा मिळतातच त्याचबरोबर मोफत औषधे, निदान आणि आहार तसेच वाहतुकीची मोफत सुविधाही पुरविली जाते.
केवळ मातांच्या आरोग्य सेवांवरच लक्ष दिले जाते असे नव्हे तर देशभरात मॅटर्नल ॲन्ड चाईल्ड हेल्थ ट्रॅकींग सिस्टिमद्वारे व्यक्तीगत लाभार्थींकडेही लक्ष पुरविले जाते. या प्रणालीत आतापर्यंत 92 दशलक्षपेक्षा अधिक माता आणि 78 दशलक्षपेक्षा अधिक मुलांची नोंदणी झाली आहे. आरोग्य सेवा एकसमान वितरण ही एक मोठी चिंतेची बाब आहे. देशात आरोग्य सेवांबाबत मागास राहिलेले 184 जिल्हे निश्चित करण्यात आले असून या भागात अधिक संसाधने आणि आरोग्य कार्यक्रमांकडे जास्त लक्ष पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
माझ्या सरकारचा आणखी एक उपक्रम आहे तो म्हणजे स्वच्छ भारत अभियान. या अभियानाचा एक भाग म्हणून आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी कायाकल्प योजना सुरु केली आहे. स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण, आरोग्यदायी राष्ट्राची पायरी आहे यावर माझा दृढ विश्वास आहे. मुलीचे रक्षण आणि शिक्षण यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ हे महत्त्वाकांक्षी अभियान आम्ही राबवित आहोत बालिका जगाव्यात, त्यांचा उत्कर्ष व्हावा आणि समाजात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी यांची आपण खातरजमा करायला हवी.
आरोग्याच्या तक्रारीपायी लोकांची आर्थिक स्थिती ढासळताना मी पाहिली आहे. वंचितांना सार्वत्रिक आरोग्यसेवा आणि आर्थिक संरक्षण देणाऱ्या यंत्रणेला संस्थात्मक रुप देण्याची गरज आहे. आपण प्रयोगशील राहिले पाहिजे आणि एकमेकांकडून शिकलेही पाहिजे. माता आणि बाल मृत्यू रोखण्यासंदर्भात तसेच किशोरांच्या उत्तम जीवनमानासाठीची आपली कटिबध्दता अधिक दृढ करण्यासाठी आणि इतर देशांबरोबरच भागीदारी करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी भारत सदैव तत्पर आहे. यासाठीच्या धाडसी उपाययोजना आणि संकल्पाप्रती एकमेकांना उत्तरदायी ठरविण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करतो.
आपण सर्व येथे जमलो आहोत, केवळ आपल्यात नव्हे, येथे उपस्थित असलेल्या केवळ 24 देशांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला अतिशय खंबीर संदेश दयायला हवा. ज्यांचे प्राण वाचविता येतील अशा प्रत्येक महिला आणि बालकांचे जीवन वाचविण्यासाठीच्या आमच्या कटिबद्धतेचा हा संदेश आहे. याची खातरजमा करण्यात पावले उचलण्यासाठी जगाने एकत्र येण्याची गरज आहे. केवळ आपल्या देशातली संसाधने वितरित करण्यासाठी भारत कटिबध्द नाही तर जगाला आणि ज्या देशांना मदतीची गरज आहे त्यांच्या मदतीलाही भारत तत्पर आहे. हा माझा वैयक्तीक दृष्टीकोन आणि माझ्या सरकारची कटिबध्दता आहे.
येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक देशाकडे, देण्यासारखे काही ना काही आहेच, भारताकडे अनुभवाची संपत्ती आहे. भारताने अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे इतर देशांना हा अनुभव विशद करण्यात भारताला आनंदच होईल. गेल्यावर्षी सार्क राष्ट्र, पोलिओमुक्त राहावीत यासाठी मदत करण्यासाठी भारताने कटिबध्दता दर्शविली होती. गरज भासणाऱ्या सार्क देशांना पेंटावालेंट लस पुरविण्याचीही आम्ही तयारी दर्शविली आहे. आमचा अनुभव आम्ही जागतिक समुदायालाही विशद करु.
कोणत्याही देशाला तंत्रज्ञान, यंत्रणा बळकट करण्यासाठी तसेच कार्यक्रम अंमलबजावणीत मदत करण्यात भारताला आनंदच होईल. आमच्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट्समधल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊ तसेच बालकांच्या आजारांवर मात करण्याचे कौशल्यही त्यांना प्रदान करु. सार्वत्रिक लसीकरण विशेषत: यावर्षाचा मिशन इंद्रधनुष संदर्भातला भारताचा समृध्द अनुभव इतर देशांना कथन करु शकतो. यासंदर्भात सार्क देशांसाठी आम्ही ही तयारी दर्शविली होती. आता येथे उपस्थित सर्व देशांसमोर मी याचा पुनरुच्चार करतो. पोलिओमुक्तीसाठीच्या पाठिंब्याबरोबरच आम्ही ही संधी देऊ इच्छितो.
या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मी तुमचे पुन्हा हार्दिक स्वागत करतो. या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनात माता आणि बाल मृत्यू रोखण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात जागतिक समुदायाला नवी दिशा मिळेल अशी आशा मी व्यक्त करतो.
नवी दिल्लीतले तुमचे वास्तव्य सुखद राहो. धन्यवाद. जयहिंद
N.Chitale/N.Sapre
I warmly welcome you to the Global Call to Action Summit 2015: PM @narendramodi https://t.co/T9KKEq8CDZ @Call2Action2015
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
For the first time the Global Call to Action Summit is being held outside USA: PM @narendramodi https://t.co/T9KKEq8CDZ @Call2Action2015
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
This Summit will provide a highly effective platform to address common challenges that will help us achieve desired goals: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
I am glad to see 24 nations present here to join together in their commitment to end preventable maternal and child death: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
A truly historic accomplishment has been the victory over Polio: PM @narendramodi https://t.co/T9KKEq8CDZ @Call2Action2015
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
I am also happy to share with you today another major milestone achieved by India. India has eliminated maternal and neonatal tetanus: PM
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
Government has added to the world’s largest immunization drive another mission known as “Mission Indradhanush” : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
India has always partnered with the global efforts on issues of child and maternal health: PM @narendramodi https://t.co/T9KKEq8CDZ
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
India also responded by acting on the first Call To Action through its commitment and launch of RMNCH+A: PM https://t.co/T9KKEq8CDZ
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
We launched Janani Suraksha Yojana where incentives were given for delivering in public institutions to beneficiaries directly: PM
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
One of the flagship programmes of my Government is the ‘Swacch Bharat Abhiyaan’ : PM @narendramodi #MyCleanIndia @Call2Action2015
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
I firmly believe that clean and hygienic environ is the stepping stone to a healthy nation: PM @narendramodi #MyCleanIndia @Call2Action2015
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
As we assemble here, we need to send a very strong message not only to ourselves, not only to 24 countries present here but to the world: PM
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
The message is of our commitment, that we will ensure that every woman, every child who can be saved will be saved: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015
I hope the next two days would provide a new direction to the global community in its journey towards ending maternal and child deaths: PM
— PMO India (@PMOIndia) August 27, 2015