Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

घोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन, या सेवेतील पहिल्या नौकेतून केला प्रवास


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्‌घाटन केले. या फेरी सेवेमुळे सौराष्ट्रमधील घोघा आणि दक्षिण गुजरातमधील दहेज दरम्यान प्रवासाचा वेळ सात ते आठ तासांवरून केवळ एका तासापर्यंत इतका कमी होणार आहे. आज उद्‌घाटन करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यामुळे प्रवासी वाहतूक करता येईल. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर यातून वाहनांचीही वाहतूक करता येईल.

पंतप्रधानानी श्री भावनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सर्वोत्तम पशु आहार संयंत्राचे उदघाटन केले.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले कि गुजरातमध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वैयक्तिकरित्या उपस्थित राहता आल्याबाबदल आपल्याला आनंद झाला आहे. ते म्हणाले कि घोघा आणि दहेज दरम्यान फेरी सेवेच्या शुभारंभाचा हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी अतिशय महत्वाचा आहे. अशा प्रकारची ही पहिलीच फेरी सेवा असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले कि गुजरातच्या जनतेचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे.

ते म्हणाले कि मानवी संस्कृतीचा इतिहास नद्या आणि सागरी व्यापाराचे महत्व उलगडून दाखवतो. गुजरात ही लोथालची भूमी आहे आपल्या इतिहासाच्या या बाबी आपण कशा विसरू शकतो असेही ते म्हणाले. हा कार्यक्रम आपला समृध्द भूतकाळ पुन्हा जिवंत करणे आणि सौराष्ट्रला दक्षिण गुजरातशी जोडण्यासाठी आहे असे पंतप्रधान म्हणाले. या दोन भागातील लोक नियमितपणे या दोन भागात ये-जा करत असतात आणि या फेरी सेवेमुळे वेळेची आणि इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले कि गेल्या तीन वर्षात गुजरातच्या विकासाला खूप महत्व देण्यात आले आहे. गुजरातला लांब समुद्रकिनारा लाभला आहे आणि यातून निर्माण होणाऱ्या संधींचा आपण लाभ घ्यायला हवा असे ते म्हणाले. सागरी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही फेरी सेवा देखील या एका मार्गापुरती मर्यादित राहणार नाही असे ते म्हणाले. अन्य जागादेखील फेरीच्या माध्यमातून जोडण्यात येतील. वाहतूक क्षेत्राचे एकात्मीकरण आणि अद्ययावतीकरण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

घोघा ते दहेज दरम्यान पहिल्या फेरीसेवेअंतर्गत त्यांनी जहाजातून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांना जहाज आणि फेरी सेवेबाबत माहिती देण्यात आली. जहाजावर त्यांनी दिव्यांगजन मुलांशी संवाद साधला.

दहेज येथे जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले कि भरभराटीसाठी बंदरे हे सरकारचे स्वप्न आहे असे पंतप्रधान म्हणाले. भारताला उत्तम आणि अधिक बंदरांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य संपर्क व्यवस्थेअभावी देशाचा आर्थिक विकास मंदावतो असे सांगून ते म्हणाले कि सरकारने बंदरांच्या पायाभूत विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.

नील अर्थव्यवस्थेवर सरकारचा भर असून नवीन भारताच्या स्वप्नाचा हा अविभाज्य भाग आहे असे पंतप्रधान म्हणाले.

N.Sapre/S.Kane/Anagha