Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चंदीगढ येथील नवीन गृहनिर्माण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे जाहीर सभेतील भाषण

चंदीगढ येथील नवीन गृहनिर्माण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे जाहीर 
सभेतील भाषण

चंदीगढ येथील नवीन गृहनिर्माण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे जाहीर 
सभेतील भाषण

चंदीगढ येथील नवीन गृहनिर्माण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे जाहीर 
सभेतील भाषण

चंदीगढ येथील नवीन गृहनिर्माण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे जाहीर 
सभेतील भाषण

चंदीगढ येथील नवीन गृहनिर्माण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे जाहीर 
सभेतील भाषण

चंदीगढ येथील नवीन गृहनिर्माण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे जाहीर 
सभेतील भाषण

चंदीगढ येथील नवीन गृहनिर्माण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे जाहीर 
सभेतील भाषण

चंदीगढ येथील नवीन गृहनिर्माण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे जाहीर 
सभेतील भाषण

चंदीगढ येथील नवीन गृहनिर्माण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे जाहीर 
सभेतील भाषण


माझ्या प्रिय बंधु आणि भगिनिंनो, एक काळ असा होता मी सुद्धा आपल्यासारखाच समोर बसून चंदीगढमध्ये मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकत होतो. कार्यक्रमांसाठी येत होतो व आपणा सर्वांमध्ये सहजपणे मिसळत होतो. पण, बदलत्या काळासोबत काही अडचणीही येतात. एकप्रकारे सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारेच निर्णय घेतात की, आम्ही उजवीकडे जायचे की डावीकडे. आता माझ्यासमोर बसलेले बहुतांश लोक ओळखीचे वाटत आहेत, त्यांच्यामध्येच मी विजयी झालो होतो. आज मी त्यांना भेटू शकत नाही. याचा कधी कधी फार त्रास होतो. पण काय करणार, व्यवस्थेमुळे ही अडचण आली आहे, मात्र दुरून आपणा सर्वांचे दर्शन होत आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सार्वजनिकरित्या आपली भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. बादलसाहेबांनी फार चांगला मुद्दा मांडला की, वरिष्ठ पातळीवरील लोकांची तर भेट होत असतेच मग ते हरियाणातील असोत, पंजाबमधील असोत की चंदीगढमधील असोत. पण, जनताजनार्दनाच्या भेटीचे प्रसंग फार कमी येतात. आज ती संधी मिळाली आहे. त्यामुळेच मी मानतो की, आजच्या कार्यक्रमाचे सर्वात मोठे यश हे होय की, आज हरियाणा, पंजाब, चंदीगढ तिघेही एकत्र बसून विकासाच्या मुद्यावर चर्चा करत आहेत. विकासासाठी योजना तयार करत आहेत.

आज सकाळी मी इथे पोहचलो आणि सर्वात प्रथम विमानतळावर नव्याने बांधलेल्या टर्मिनलचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला मिळाले. मी चंदीगढमध्ये बराच काळ राहिलो आहे, फार वेळा आलो आहे. पण, मी कधी विचार केला नव्हता की चंदीगढमध्ये एवढा शानदार विमानतळ कधी होईल, मी आज ही सर्व व्यवस्था पाहून खूप प्रभावित झालो. चंदीगढची शोभा वाढवणारे विमानतळ व टर्मिनल बांधल्याबद्दल मी विभागाचे मंत्री व सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. आणि एवढेच नाही तर एक प्रकारे पंजाब असेल, हरियाणा असेल, हिमाचल असेल, चंदीगढ असेल, जम्मू-काश्मीर असेल या सर्व प्रदेशांसाठी ही हवाई वाहतूक सेवा आर्थिक विकासासाठी महत्वाची भूमिका बजावेल. मी या विभागांच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, की फक्त लोकांची ने-आण करण्यासाठीच हा विमानतळ नाही, तर आमचा शेतकरी जे काही पिकवेल त्यासंदर्भातही हा विमानतळ कशाप्रकारे उपयोगी पडेल. कारण त्यांनी उत्पादित केलेला माल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल आणि आमच्या शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळेल. त्याला चांगले उत्पन्न प्राप्त होईल. हे महत्त्वपूर्ण काम करण्याच्या दिशेनेही या सुविधेचा उपयोग झाला पाहिजे. यासंदर्भात मी आज त्यांच्याशी बोललो आहे. ते यावर अभ्यास करुन पुढील निर्णय घेतील.

बंधु आणि भगिनिंनो मला आज चंदीगढमध्ये पीजीआयला जाण्याची संधी मिळाली, आणि आज येथे चंदीगढमध्ये डिजिटल सेवा, ऑनलाईन सेवा, त्यासाठीच्या ऍप्सचे लोकार्पण झाले आहे. डिजिटल इंडिया हे आमचे स्वप्न आहे. हे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शहराने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक विभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, प्रत्येक सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. तुम्ही पाहता की माहिती तंत्रज्ञानाने शासन व्यवस्थेसमोर कशी आव्हानं निर्माण केली आहेत आणि ही शासन व्यवस्थेची जबाबदारी आहे की, या तंत्रज्ञानाच्या अनुकूलतेने शासन व्यवस्थेमध्ये कशा सुधारणा घडून येतील ते पाहणे. सामान्य व्यक्तीला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या हक्काच्या गोष्टी कशा मिळवून देता येऊ शकतील, त्याच्या तक्रारी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरळ योग्य ठिकाणी कशा पोहचवता येतील, निर्धारीत वेळेत समस्यांचे समाधान कसे होईल, ही सर्व जबाबदारी शासनव्यवस्थेची आहे.

एका ऍपची निर्मिती केली म्हणून मी सांगू शकतो, हे फक्त तंत्रज्ञान नाही. हे एकप्रकारे सामान्य नागरिकाचे सबलीकरण आहे. त्याच्या मोबाईल फोनच्या माध्यमातून तो सरकारला हिशोब मागू शकतो, सरकारकडून काम मागू शकतो आणि सरकारने काम देण्यास दिरंगाई केली तर त्याचा जबाब मागू शकतो. एका डिजिटल ऍपच्या माध्यमातून आज येथील नागरिकांना एवढी ताकद मिळत आहे. अशाप्रकारचा चांगला उपक्रम राबवल्याबद्दल मी येथील प्रशासनाचे अभिनंदन करतो. आज येथे गृहनिर्माण योजनेचे लोकार्पण झाले आहे. हजारो परिवारांना राहण्यासाठी स्वत:चे घर मिळेल. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक स्वप्न असते की, त्याचे स्वत:चे घर असावे. प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. गरीबातील गरीब व्यक्ती, फुटपाथवर बसून चपला-बुट दुरुस्तीचे काम करणारी व्यक्ती असेल, त्याच्याही मनात एक इच्छा असते की, आपले स्वत:चे घर असावे. स्वातंत्र्यानंतर एवढा काळ लोटला आहे, आमच्या देशातील गरिबांना राहण्यासाठी घर मिळाले पाहिजे की नाही ? गरीब कुटुंबाला एक घर मिळाले पाहिजे की नाही मिळाले पाहिजे.

बंधु आणि भगिनिंनो तुम्ही दिल्लीमध्ये जे सरकार स्थापन केले आहे, तुमचे स्वप्न हेच त्या सरकारचे स्वप्न आहे. तुमच्या मनातील जी इच्छा आहे, ती पूर्ण करण्याचा विडा आम्ही उचलला आहे. मला माहित आहे की, हे काम कठीण आहे. 60 वर्षात जेवढे काम झाले असेल त्यापेक्षा जास्त काम सात वर्षात करण्याची आवश्यकता आहे. हा विचार करुन आम्ही हा विडा उचलला आहे.

2022 मध्ये आजपासून सात वर्षांनी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी बलिदान दिले- भगतसिंग, सुखदेव, राजगुरु. तुम्ही अंदमान निकोबारला जाऊन पाहा, अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तींची यादी पाहिली तर त्यात पंजाबमधील मोठया प्रमाणात युवक ज्यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले, त्यांची नावे दिसतील. कित्येकांनी बलिदान दिले, कित्येकांनी आपले तारुण्य तुरुंगामध्ये घालवले, कित्येकांनी पोलिसांचा अत्याचार सहन केला, कित्येकांनी ब्रिटीश राजवटीचा अत्याचार सहन केला, तेंव्हा कुठे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीर शहीदांना, आंदोलनकर्त्यांना आम्ही कशाप्रकारचा हिन्दुस्तान देऊ इच्छितो? काय आजपासून प्रत्येक देशवासीयाच्या मनात एखादे स्वप्न साकार करण्याचा संकल्प होऊ शकत नाही का, की मी आपल्या आयुष्यात या पाच गोष्टी, सहा गोष्टी, सात गोष्टी, दोन गोष्टी यांचे पालन करेन. ज्यामुळे समाजाचे भले होईल, देशाचे भले होईल, गरीबांचे कल्याण होईल. काय आपण एखादा संकल्प करुन स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांना आदरांजली नाही देऊ शकत? काळाची गरज आहे की, प्रत्येक देशवासियाने आजपासूनच स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष कसे असेल त्याची तयारी सुरू केली पाहिजे. विकासाच्या माध्यमातून, समस्यांच्या निराकरणातून याची सुरुवात केली पाहिजे आणि त्यात माझे एक स्वप्न आहे. ते म्हणजे 2022 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्षात, देशातील गरीबातील गरीब व्यक्तीला राहण्यासाठी स्वत:चे घर असले पाहिजे. हे काम मी हाती घेतले आहे. मला याकामी तुमची मदत हवी आहे, सहकार्य हवे आहे. याचाच भाग म्हणून मला आज हजारो चंदीगढवासियांना गृहनिर्माण योजने अंतर्गत घरे वाटप करण्याचे भाग्य मिळाले आहे.

आगामी काळात कोट्यवधी घरांची आवश्यकता भासणार आहे. जेंव्हा कोट्यवधी घरं तयार होतील, एकप्रकारे इतक्या मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करावी लागेल, जेवढी युरोपातील नव्या देशांची लोकसंख्या आहे, तेवढी इथे आम्हाला वाचवावी लागेल. इतकी घरं बांधावी लागतील. गरीबांसाठी बांधावी लागतील आणि मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, जेंव्हा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व घटकपक्षांनी माझी नेतेपदी निवड केली होती. त्यावेळी मी सांगितले होते की, माझे सरकार गरींबाप्रती समर्पित असेल. गरीबांच्या कल्याणासाठी आहे. आमच्या सर्व योजना गरीबांच्या कल्याणासाठी असतील आणि त्यापैकीच एक महत्वाची योजना आहे, गरीबांसाठी गृहबांधणी. गरीबातील गरीब व्यक्तीला घर देणे. त्यावर आमचे काम सुरू आहे.

बंधु आणि भगिनिंनो हा परिसर, एकप्रकारे येथील प्रत्येक परिवार भारतमातेचे सुरक्षाकवच आहे. येथील प्रत्येक परिवाराने मग तो हिमाचल असो, उत्तराखंड असो, हरियाणा असो, पंजाब असो, हा सर्व भूभाग असा आहे जेथील जवळपास प्रत्येक परिवारातील लोक सैन्यदलात कार्यरत असलेले पाहायला मिळतील. काही आजच्या पिढीतील असतील, काही मागच्या पिढीतील असतील. भारतमातेच्या संरक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांची ही भूमी आहे. एकप्रकारे भारतमातेचे सुरक्षा कवच असलेले परिवार येथे आहेत. याच चंदीगढमध्ये मी सांगितले होते की, आम्ही एक श्रेणी-एक निवृत्तीवेतन (वन रँक वन पेन्शन) साठी गांभीर्याने पावलं उचलत आहोत.

बंधु-भगिनिंनो आमचे सरकार येताच आम्ही कामाला सुरूवात केली. सैन्यदलातील लोकांशी चर्चा केली, विचारविनिमय केला आणि जसजसे खोलात जाऊ लागतो तसतशी ही समस्या आणखी गहन होत गेली. आणि मला दु:ख या गोष्टीचं वाटतं की, मागील सरकारने वन रँक वन पेन्शन काय आहे, त्यामुळे काय जबाबदारी वाढणार आहे, त्यासाठी कोणती पावलं उचलली पाहिजेत, याविषयी कधी विचारच केला नव्हता. जर विचार केला असता तर, मागील सरकारने वन रँक वन पेन्शनसाठी 500 कोटींची तरतूद केली नसती आणि जेंव्हा आम्ही ऐकले की, मागील सरकारने वन रँक वन पेन्शनसाठी 500 कोटींची तरतूद केली, पण, आम्हाला वाटत होते की, हे काम 500 कोटींचे नाही, जास्त खर्च येईल. जेंव्हा आम्ही याविषयीचा आढावा घेतला तेंव्हा ही बाब 10 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली. 10 हजार कोटी रुपये.

भारतासारख्या देशासाठी ही रक्कम लहान नाही. पण देशासाठी जिवाची बाजी लावणारी व्यक्ती अमूल्य आहे. म्हणूनच देशातील गरिबातील गरीब व्यक्तीने सैन्यदलातील जवानांसाठी एवढा मोठा निर्णय घेतला. याचे श्रेय केवळ सरकारला देऊ नका. या वन रँक वन पेन्शनसाठी नरेंद्र मोदीला श्रेय देऊ नका. मी देशातील सैनिकांना सांगतो की ज्या गरीब व्यक्तींनी आपल्या काही गोष्टींचा त्याग करुन तुमच्या सन्मानासाठी काही देण्याचा निर्णय घेतला आहे आणि म्हणूनच वन रँक वन पेन्शनसाठीचे श्रेय जर कोणाला जाते तर ते देशातील गरीबांना जाते. माझ्या देशातील सामान्य व्यक्तीला जाते ज्याने आपला हक्क सोडून सैन्यदलातील जवानांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यापेक्षा अभिमानाची बाब असू शकत नाही, आम्ही आमचे वचन पूर्ण केले आहे.

आगामी काळात…परंतु, मी अजूनही पाहत आहे, काही लोकांची आंदोलन करण्याची खोड जात नाही. अजूनही त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. त्यांना वाटत होते की ही बाब एवढी गंभीर आहे की, पाच ते सात वर्षे त्यांची गाडी चालू राहिल. त्यांना वाटत नव्हते की मोदी हा निर्णय घेईल. आता हा निर्णय घेतला आहे तर ते आपली गाडी कशी चालेल या विचारात पडले आहेत. बंधु-भगिनिंनो मी आपल्याला विश्वास देतो की, देशहिताचा कोणताही निर्णय जो सरकारला करावयाचा असेल, तो प्रथम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. कारण देशाला पुढे नेण्यासाठीच आम्ही सरकार चालवत आहोत, विकासाची नवी उंची गाठण्यासाठी आम्ही सरकार चालवत आहोत.

तुम्ही सर्वांनी आम्हाला भरघोस बहुमत दिलं, 30 वर्षानंतर दिल्लीत संपूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. परंतु, माझ्या बंधु-भगिनिंनो मागच्या काही दिवसात लोकसभेचं जे दृश्य तुम्ही पाहिलं आहे, राजकीय पक्षांच्या अशा वर्तणुकीसाठी देशातील जनता त्यांना कधी माफ करणार नाही. तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. सभागृहात जा, बसा, तासनतास चर्चा करा, एक दिवस नाही तर दोन दिवस चर्चा करा, पाच दिवस करा, सात दिवस करा, पण लोकशाहीला न मानणं, लोकशाहीच्या नियमांचा स्वीकार न करणं, आणि 400 लोकसभा सदस्यांची पर्वा न करणं, पण 40 व्यक्ती देशाच्या भवितव्याशी अडकाठी करण्याचं षडयंत्र् रचतात, ही देशाच्या लोकशाहीची परवड आहे. भारताच्या लोकशाहीचा अपमान आहे, बंधु-भगिनिंनो. म्हणून आज देशात लोकशाहीविषयी जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक खासदारावर संसदेचे कामकाज चालू देण्याविषयी दबाव निर्माण करण्याची गरज आहे. तुम्ही संसदेचे कामकाज चालू देण्यासाठी मदत करा, संसदेत चर्चा करा, आपल्या भागातील समस्यांवर चर्चा करा, तुम्ही सरकारला धारेवर धरा, तुम्ही मोदीकडे हिशोब मागा परंतु संसदेत जाऊन काम करा. या गोष्टीसाठी जनताजनार्दनांनी खासदारांवर दबाव टाकण्याची वेळ आली आहे. काही आपल्या अहंकाराने देशाच्या संसदेचे विभाजन करत होते, संसदेला चालू द्यायचे नाही. बंधु-भगिनिंनो यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते असू शकत नाही. म्हणून मी निर्णय घेतला आहे, जर लोकसभेत आम्हाला बोलण्यापासून रोखलं जात असले, लोकसभेत आमचा आवाज रोखला असेल, तर लोकसभेच्या पुढेही एक जनसभा आहे आणि जनसभा कोणापेक्षा कमी नाही म्हणून आज माझ्या लोकसभेतील प्रकरण मी जनसभेसमोर मांडत आहे.

बंधु-भगिनिंनो विकासाची नवनवी शिखरं पार करण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचली आहेत. मग ती भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई असो, परदेशातील काळा पैसा परत आणण्याचा मुद्दा असो, महागाईवर नियंत्रणाचा प्रयत्न असो, गरीबातील गरीब व्यक्तीला या विकास यात्रेत पुढे आणण्याची संधी मिळते, मग जन-धन बँक खाते असो, विमा योजना असो, अटल पेन्शन योजना सुरु केली आहे, गरीबांच्या कल्याणासाठी हे सर्व आहे. आपल्या देशातील शेतकरी, त्याला नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो, त्याला नुकसानभरपाई देताना कोतेपणा दिसून येत होता. आम्ही तुमच्यासाठी निर्णय घेतला. अनेक महत्वाचे निर्णय घेतले. पूर्वी 50 टक्के नुकसान झाल्यानंतर नुकसानभरपाई मिळत होती. आम्ही हे प्रमाण 35 टक्के केले. आम्ही त्यांचे कार्यक्षेत्र वाढवले. आम्ही नुकसानभरपाईची रक्कम वाढवली. जेंव्हा गारपीट झाली तेंव्हा अगोदर पैसे देण्याचे काम दिल्लीत बसलेल्या या सरकारने केले. आम्ही विम्याचा निर्णय घेतला. मी कालच काही शास्त्रज्ञांसोबत होतो. मी काल मक्यापासून इथेनॉल तयार करण्याची प्रक्रिया कशी व्यापक प्रमाणावर करता येईल, कमी खर्चात करता येईल, कारण पंजाबातील माझा शेतकरी जो आता मक्याची शेती करतो त्यापासून कोणी इथेनॉल काढणार असेल तर शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील व देशातील पर्यावरणाचे रक्षणही होईल. यावर काम करण्यासाठी मी शास्त्रज्ञांना सांगितले आहे, यावर साधे सरळ तंत्रज्ञान विकसित करण्यास सांगितले आहे जे छोट्या शेतकऱ्यालाही उपयुक्त ठरेल. आम्ही एकापाठोपाठ एक निर्णय घेत आहोत, कारण जोपर्यंत देशातील प्रत्येक गाव सक्षम होणार नाही, सामर्थ्यवान होणार नाही, तोपर्यंत हा देश सामर्थ्यवान होणार नाही. गावाची ताकद वाढली पाहिजे आणि त्यादिशेने आम्ही एकापाठोपाठ एक योजना तयार करत आहोत. आम्ही स्मार्ट सिटीची योजना आणली. मी चंदीगढवासियांना आवाहन करतो की, स्मार्ट सिटीसाठी चंदीगढमध्ये एक जनचळवळ उभा राहिली पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने स्मार्ट सिटीत आपले योगदान दिले पाहिजे. येथील युवकांमध्ये स्मार्ट सिटीवर स्पर्धा झाली पाहिजे, ऑनलाईन निबंध स्पर्धा झाली पाहिजे. आम्हाला स्मार्ट सिटी कशी पाहिजे आणि त्यात आमचे योगदान काय असेल. एक नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य असेल. प्रथमच देशात स्पर्धेच्या रुपाने स्मार्ट सिटींची निवड होणार आहे. जी शहरं पुढे जातील, जी शहरं महत्त्वपूर्ण निर्णय घेतील, जी शहरं आपल्या पायांवर उभी राहतील, ते स्मार्ट सिटी स्पर्धेत पुढे जातील. मग नंतर केंद्र सरकार त्यांना अतिरिक्त रक्कम देऊन 21 व्या शतकातील शहर निर्मितीसाठी पुढे नेईल. म्हणून मी चंदीगढला आमंत्रण देतो की, तुम्हाला जी संधी मिळाली आहे, पहिल्या यादीत चंदीगढचा समावेश आहे. पण, यापुढची स्पर्धा कठीण आहे म्हणून पुढील स्पर्धेसाठी चंदीगढला तयार राहावे लागेल. फक्त लालफित लालफित अशी ओरड करण्यात काही अर्थ नाही. म्हणून मी चंदीगढच्या लोकांना आग्रह करतो, प्रशासनातील लोकांना आग्रह करतो की स्मार्ट सिटीसाठी जनतेला प्रशिक्षित करा. एक जनचळवळ तयार करा मग जनता आपण होऊन स्मार्टसिटीसाठी पुढे येईल, मग सरकारही स्मार्ट सिटीसाठी विलंब करणार नाही. आगामी काळात, आमच्यासाठी हाही विकासाचा मुद्दा असणार आहे. विकासाचा मुद्दा आम्ही पुढे करत आहोत. मला खात्री आहे की, विकासाच्या या मंत्रासाठी मग पंजाब असेल, हरियाणा असेल, चंदीगढ असेल, हिमाचल असेल, जम्मू-काश्मीर असेल हा पूर्ण प्रदेश विकासाची नवनवी शिखरं गाठेल, त्यामुळे आमच्या तरुणांना रोजगार मिळेल. जेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही तरुणांना रोजगार पुरवू, तेवढी देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. यासाठीच आम्ही संकल्प करु. मी पुन्हा एकदा या समारंभासाठी आदरणीय मुख्यमंत्री, आमचे राज्यपाल साहेब, येथील सर्व खासदारांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. खूप-खूप धन्यवाद.

S.Thakur/M.Desai