Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चार औषधनिर्माण सार्वजनिक उपक्रमांच्या अतिरिक्त जमिनींची विक्री करायला मंत्रिमंडळाची मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदुस्तान ॲण्टिबायोटिक्स लिमिटेड (एचएएल), इंडियन ड्रग्ज् ॲण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (आयडीपीएल) आणि बेंगॉल केमिकल्स ॲण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (बीसीपीएल) यांच्या अतिरिक्त जमिनींची विक्री करायलामंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली. दायित्व पूर्ण करण्यासाठी ही मंजुरी देण्यात आली असून, अशा प्रकारे राष्ट्रीय संपत्ती राष्ट्रहितासाठी वापरण्यात येणार आहे.

सरकारी संस्थांसाठी खुल्या स्पर्धात्मक लिलावातून विक्री केली जाईल आणि विक्री प्रक्रियेतून शिल्लक दायित्व पूर्ण केले जाईल. या सार्वजनिक उपक्रमांमध्ये व्हीआरएस / व्हीएसएस राबवली जाईल.

जमिनीच्या उर्वरित भागाचे व्यवस्थापन गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग आणि सार्वजनिक उपक्रम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले जाईल.

शिल्लक दायित्व पूर्ण झाल्यानंतर आयडीपीएल आणि आरडीपीएल बंद करण्यासाठी पावले उचलली जातील. एचएएल आणि बीसीपीएलसाठी धोरणात्मक विक्रीचा पर्याय शोधला जाईल.

B.Gokhale/S.Kakde/D.Rane