Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चित्रपट सह निर्मितीबाबत भारत आणि इस्त्रायल यांच्यातल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


भारत आणि इस्त्रायल यांच्यात चित्रपट सह निर्मिती बाबत झालेल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्व लक्षी प्रभावाने मंजुरी दिली आहे.इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्या भारत भेटी दरम्यान, नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाउस इथे उभय देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय पार्टी समवेत भारतीय चित्रपटाची सह निर्मिती म्हणजे भारतीय निर्मात्याला आंतर राष्ट्रीय निधी उपलब्ध होण्याची संधी आणि पटकथा, वितरण यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचा हात उपलब्ध होऊ शकतो. या करारा अंतर्गत चित्रपटाची सह निर्मिती, भारत आणि इस्त्रायल या दोन्ही देशांसाठी राष्ट्रीय निर्मितीसाठी पात्र ठरेल.यामुळे सृजनशीलता, कलात्मकता, तंत्रसाहाय्य, वित्तीय आणि विपणन संसाधनाचा, दोन्ही देशांचा एकत्रित संचय होणे शक्य होईल.

सह निर्मित चित्रपट,दोन्ही देशात, देशांतर्गत निर्मिती म्हणुन दोन्ही देशातल्या चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकेल.त्याचबरोबर उभय देशात निर्मिती आणि निर्मिती नंतर कार्यासाठी असलेल्या प्रोत्साहनपर लाभासाठीही पात्र ठरेल.

चित्रपट सह निर्मिती करारावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे कला आणि संस्कृती यांची देवाण घेवाण,सदिच्छा निर्मिती त्याचबरोबर चित्रपट निर्मितीच्या विविध भागांची जाण आणि उभय देशातल्या लोकांना परस्परांना जाणून घेणे सुलभ होणार आहे. या करारामुळे कला, तंत्र आणि तंत्र बाह्य क्षेत्रात रोजगार निर्मितीला मदत होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar