पीएम्इंडिया
चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष जनरल फान चांगलाँग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत आणि चीन यांच्या सैन्यातल्या वाढत्या संबंधांविषयी त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी धोरणात्मक विश्वास वाढविणे आणि सीमा भागात शांतता कायम राखणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
भारत आणि चीन यांच्यातले लष्करी सहकार्य दृढ करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचे त्यांनी स्वागत केले. 2016 मध्ये भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूमध्ये चीनच्या सहभागाचंही पंतप्रधानांनी स्वागत केलं.
N. Chitale/S.Tupe/N.Sapre
Met Gen. Fan Changlong, Vice-Chairman of Central Military Commission of China. https://t.co/fTivnSYJAX pic.twitter.com/HZjmfiycgp
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2015