Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जगभरातील विविध संस्कृतींचा आदर करण्याची शिकवण देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिक


देशाचारान् समयाञ्जातिधर्मान् बुभूषते यस्तु परावरज्ञः।
स तत्र तत्राधिगतः सदैव महाजनस्याधिपत्यं करोति॥
हे संस्कृत भाषेतील सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर सामायिक केले आहे.
जगभरातील विविध संस्कृतींचा आदर केल्याने लोकांमध्ये विश्वास आणि सहकार्याची भावना वाढीला लागते, तसेच परस्परांना समजून घेण्याची वृत्ती आणि बंधुभाव अधिक दृढ होतो, असा या सुभाषिताचा अर्थ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
जगभरातील विविध संस्कृतींचा आदर राखल्याने नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होते. यामुळे परस्परांना समजून घेण्याची वृत्ती आणि बंधुभाव अधिक दृढ होतो.
देशाचारान् समयाञ्जातिधर्मान् बुभूषते यस्तु परावरज्ञः।
स तत्र तत्राधिगतः सदैव महाजनस्याधिपत्यं करोति॥

***

NehaKulkarni / TusharPawar / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai