Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जड जवाहर उद्योगांनी जागतिक गरजा लक्षात घेऊन कार्य करावे – पंतप्रधान

जड जवाहर उद्योगांनी जागतिक गरजा लक्षात घेऊन कार्य करावे – पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील जडजवाहर क्षेत्रातील उद्योजकांना आव्हान केले की, त्यांनी जागतिक बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन भारता बाहेर या क्षेत्राची व्यापकता वाढवावी.

अखिल भारतीय जडजवाहीर व्यापार संस्थेने खास पंतप्रधानांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधानांनी उद्दीष्ट्ट साध्य करण्यासाठी नूतनीकरण आणि कौशल्य विकासावर भर द्यावा तसेच जागतिक पातळीवर वाढत्या हस्तकलाकुसरीच्या दागिन्यांच्या मागणीकडे त्यांनी उद्योजकांचे लक्ष वेधले.

सध्याच्या सीमाशुल्क संबंधित प्रकारणांकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की, सीमा शुल्क प्रकणांमुळे जडजवाहीर उद्योगांना सरकारसाठी काम करण्याची सुवर्ण संधी आहे.

पंतप्रधानांनी या उद्योगातील सर्व उद्योजकांना त्यांच्या अघोषित मालमत्ता संबांधि माहिती 30 सप्टेंबर 2016 पर्यंत घोषित करावी असे सांगितले.

B. Gokhale